वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस प्रतिनिधि
घुग्घुस येथील संतोष विठोबा पोतराजे वय ३५ वर्षे हा रोज मजुरीचे काम करीत होता. परंतु जुनाट जठरांत्र मार्गाच्या रोगाने तो त्रस्त झाला, त्यामुळे त्याचा उदरात असह्य दुखणे सुरु झाले. तो खाजगी रुग्णालयात गेला असता त्याला डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. जवळपास 4 लाख 50 हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी लागत असल्याने त्याचे कुटुंब आर्थिक विवंनचनेत सापडले. गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना मदतीसाठी भटकावे लागले. त्यांच्या नातेवाईकांनी संतोष पोतराजे यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट करून दिली, त्यांनी आपली समस्या दादांना सांगितली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून सर्वतोपरी मदत मिळणार अशी ग्वाही दिली.
दुसऱ्याच दिवशी संतोष पोतराजे यांना शस्त्रक्रियेसाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तिथे भर्ती करण्यात आले व जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. संतोष पोतराजे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ते घरी परतले.
घरी परतल्यानंतर स्वस्थ झाल्यावर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रास सहपरिवार भेट दिली व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली. मोफत उपचारासाठी मदत केल्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे आभार मानले. याप्रसंगी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरण बोढे, संतोष पोतराजे त्यांच्या पत्नी व नातेवाईक उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...