आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*
( सय्यद शब्बीर जागीरदार )
जिवती:-स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन संपूर्ण विदर्भ राज्यात 13 दिवशीय जनजागृती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून जेष्ठ विदर्भवादी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार युवा विदर्भवादी विदर्भ राज्य समर्थक सामाजिक कार्यकर्ते गोविंद गोरे,रोशन येवले,स्वप्नील कोहपरे यांनी हनुमान जन्मोतत्सवाच्या च्या पावन दिनी महात्मा गांधी,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राजुरा येथील संविधान चौकात मालार्पण करीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा हाती घेत विदर्भातील तरुणांचे व लोकांचे मत जाणून घेण्याकरिता या यात्रेची सुरवात ही जिवती तालुक्यातील पाटण येथून केली असून दिनांक 16 एप्रिल 2022 पासून विदर्भ जनसंवाद यात्रेत विदर्भातील 11 जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे.या यात्रेत विशेषता विदर्भातील तरुण वर्गाना बोलत करत स्वतंत्र विदर्भ राज्यसंदर्भात तरुणांनाचे, शालेय युवकांचे,सामान्य माणसांचे,सुशिक्षितांचे,मत जाणून घेण्यात येणार आहेत.विदर्भातील सामान्य लोकांना,तरुणांना या यात्रेदरम्यान स्वतंत्र विदर्भ राज्याचे महत्व पटवून सांगण्यात येणार आहे.
या यात्रे दरम्यान वेगळा विदर्भ का हवा आहे?विदर्भ सर्वगुण संपन्न असताना विदर्भ राज्याची आर्थिक वस्तुस्थिती मागसलेपण,कुपोषण बेरोजगारी, सिंचन, शेतकरी आत्महत्या,विकास कामाचा अनुशेष या सर्व बाबी विदर्भातील जनतेने का सहन कराव्यात ? विदर्भात वनसंपदा,खनीज ,पाणी, भरपूर जमीन, पिके सर्व मुबलक असताना येथील कच्चा माल हा पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यानां द्यायचा आणि विदर्भानी मात्र केवळ अन्याय सहन करायचा?विदर्भ महाराष्ट्रात सामील झाल्यापासून विदर्भावर जणू लुटिचा एक इतिहास निर्माण झालेला पाहायला दिसतो आहे.संपूर्ण महाराष्ट्रात विजनिर्मिती ही विदर्भातुन होत असते आणि संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महराष्ट्र पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहराना किंवा इतर राज्यांना विदर्भातुन वीज पुरवठा करायचा आणि लोड शेटींग ही मात्र विदर्भातील जनतेने सहन करायची ?विदर्भातील जनतेला फक्त प्रदूषण, धुळ, आपघात, उष्णता,भारनिमन, यांचे मात्र चटके सोसावे लागत आहेत.
यामुळे आता विदर्भातील जनतेवर वेगळा विदर्भ तोडून घेण्याची वेळ आली असून विदर्भ राज्याच्या या चळवळीत सामील होण्याचे आवाहन यावेळी जेष्ठ विदर्भवादी नेते मिलिंद गड्डमवार, गोविंद गोरे, रोशन येवले स्वप्नील कोहपोरे यांनी विदर्भ वशियांना केली आहे.वेगळ्या विदर्भच्या मुद्यावर विदर्भातील जनतेने आपला विकास होईल या हेतूने अनेक राजकीय नेत्यावर विश्वास ठेवत विदर्भातील जनतेने अनेकदा राजकीय नेत्यांना सत्तेवर सुद्धा बसवले परंतु राजकीय नेत्यांनी फक्त विदर्भाच्या नावाने आपली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे पाहाव्यास मिळाले आहे. यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठींबा न घेता स्वखर्चाने मदत मिळेल त्या पद्धतीने जेष्ठ विदर्भवादी नेते श्री. मिलिंद गड्डमवार यांच्या संकल्पनेतून युवा विदर्भवादी विदर्भ राज्य समर्थकश्री.गोविंद गोरे, रोशन येवले, स्वप्नील कोहपोरे यांच्या सहकार्याने हि जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात केली असून विदर्भाती जनतेला तरुणांना, विद्यापीठातील युवकांना, सामान्य नागरिकांना,व्यवसायिकानां,शेतकऱ्यांना,राजकीय पुढऱ्यानां ही वेळ स्वतंत्र विदर्भ राज्य घेण्याची असून सर्व पक्षानी सर्व जनतेंनी एकत्र येत आपल्या हितासाठी आपले मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन औन्ध विदर्भ राज्य मिळवू जवळील तेलंगनां राज्याप्रमाणे प्रगतशील होऊ असे मार्गदर्शन ही टीम विदर्भातील आकराही जिल्हात पोहचुन करणार आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...