Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती ते कुंभेझरी अर्धवट...

चंद्रपूर - जिल्हा

जिवती ते कुंभेझरी अर्धवट रस्ता अपघाताला देत आहे आमंत्रण वाहतुकीस धोकादायक

जिवती ते कुंभेझरी अर्धवट रस्ता अपघाताला देत आहे आमंत्रण वाहतुकीस धोकादायक

निधी अभावी रस्त्याचा काम अतिशय संथ गतीने सुरू

जिवती :-संपूर्ण जिवती तालुका अतिशय दुर्गम, नक्षलग्रस्त व डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो, या तालुक्याची निर्मिती सन २००२ मध्ये करण्यात आली. तेव्हा पासून संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांची कामे कधीच झाली नव्हती पण मागील वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील जिवती ते कुंभेझरी या रस्त्याच्या कामांचे उद्घाटन खासदर बाळूभाऊ धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.

पण आज घडीला तालुक्यातील काही रस्त्याचे काम अद्यापही ठप्प आहेत, त्यातीलच एक रस्ता म्हणजे जिवती ते कुंभेझरी हा आहे. या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधी अभावी अतिशय संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे. जिवती परिसरातील काही रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याही रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. जिवती ते कुंभेझरी या रस्त्यावर काही ठिकाणी तर नुसती गिट्टी टाकून ठेवली आहे तर काही ठिकाणी गिट्टीवर मुरूम कमी प्रमाणात टाकला आहे. दिड वर्ष उलटून गेले तरी, पुढील काम सुरू केले जात नसल्याने वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. रस्ता करायचा नव्हता तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, असा प्रश्न यानिमित्ताने केला जात आहे.

कुंभेझरी कडे जाण्यासाठी जिवती येथील रहिवाशांना हाच एक मुख्य मार्ग आहे. या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक या योजनेच्या निधीतून केले जात आहे. डिसेंबर २०२० रोजी या कामांचे उद्घाटन करण्यात आले. तर काम पूर्ण करण्याचा दि. डिसेंबर २०२१ असताना सुद्धा आजपर्यंत अर्धवटच काम झाल आहेे. उद्घाटन झाल्या नंतर काम जदल गतीने होईल, अशी अपेक्षा होती, परंतु दिड वर्ष होत आले तरी कामाला म्हणावी तशी गती नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. यात प्रामुख्याने जिवती ते कुंभेझरी या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

नवीन रस्ता होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण, संपूर्ण रस्ता खोदून काढल्यानंतर या रस्त्याच्या पुढील कामाला जशी म्हणावी तशी सुरुवात झाली नाही. गिट्टी व मुरूम टाकून ठेवलेल्या या मार्गावरून वाहन चालविणे आता खूपच अवघड झाले आहे.

या रस्त्याचे संथ गतीने काम सुरू आहे तर, गिट्टी व मुरूम टाकलेला हा रस्ता खड्डेमय झाला आहे. वाहनधारक खड्डे वाचविण्यासाठी मिळेल त्या मार्गाने वाहन नेतात. परिणामी हा मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे  या रस्त्याचे काम अत्यंत कासवगतीने सुरू आहे, हा संपूर्ण मार्ग धोकादायक झाला असून, काम तातडीने पूर्ण करा. सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला मदत करा, अशी मागणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

या रस्त्याचे काम का गतीने केले जात नाही, हाच प्रश्न पडतो. जिवती ते कुंभेझरी हा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. संथ गतीने होणाऱ्या या कामास पूर्णत: प्रशासन जबाबदार आहे.

संतोष इंद्राळे रहिवासी, 
जिवती

राज्य सरकार कडून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा निधी उपलब्ध होत नसल्याने या रस्त्याचे काम थांबलेे आहे, तसेच व मजुराच्या उपलब्धते अभावी काम रखडले आहे.

गणेश मारलावार, कंत्राटदार

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...