Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / मानवी कल्याणासाठी समर्पणाने...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

मानवी कल्याणासाठी समर्पणाने कार्य करणे म्हणजेच बाबासाहेबांना आदरांजली

मानवी कल्याणासाठी समर्पणाने कार्य करणे म्हणजेच बाबासाहेबांना आदरांजली

खासदार बाळू धानोरकर यांचे प्रतिपादन

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक विचार आहे . केवळ जयंती , महापरिनिर्वाण असे कार्यक्रम करून आपली जबाबदारी संपत नाही तर बाबासाहेबांचे कार्य त्यांचे आदर्श, प्रत्यक्ष अंगीकारून मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून द्यावे लागेल, तरच त्यांचे वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी आणि नवीन पिढीला दिशा देईल, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

          चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यासोबतच काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती दिनेश चोखारे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती पवन अंगदारी, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल राजा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस जेष्ठ नेत्या अश्विनी खोब्रागडे, युवा नेते सुनील पाटील, बाळू डांगे, आकाश कोडापे, दिनेश शिरपूरकर, निर्मल जगताप, कपिल भस्मे, धनराज पुराणे, सोनू देशपांडे, सुयोग खोब्रागडे, युवराज खोब्रागडे, डेजी सोनडुले, रेखा बारसागडे, शुभम पारखी, धीरज रामटेके. सूरज रत्नपारखी यांची उपस्थिती होती.  

           खासदार बाळू धानोरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आबेडकर हे राजकारणी, समाजकारणी होते, हे सर्वानाच माहीत आहे. पण, ते अत्यंत विद्वान, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ . बाबासाहेबांची ओळख आहे.

              सप्टेंबर १९४३ मध्ये विद्युत आणि सार्वजनिक कामे या विषयावरील एक कमिटी तत्कालीन व्हाइसरॉबच्या सरकारने गठित केली होती. या विभागाचे मंत्री या नात्याने डॉ . बाबासाहेब या कमिटीचे प्रमुख होते. त्यांनी स्वस्त मुबलक विजेसाठी काही उपाय सुचविले होते . त्यासाठी त्यांनी केंद्रीय व्यवस्था ( Centralised System ) सुचविली होती . मुबलक वीज कशासाठी ? वर औद्योगिकीकरणासाठी , औद्योगिकीकरण कशासाठी ? तर गरिबीच्या चिरंतन फेऱ्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी , असे विचार नी त्यांच्या अहवालात व्यक्त केले आहेत . १९ ४८ मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आला . स्वातंत्र्यानंतर सरकारी क्षेत्रात विद्युतनिर्मिती आणि वितरणाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले. त्यामुळे ऊर्जामंत्री म्हणून त्यांचे अतुलनीय योगदान आहे . राष्ट्राची जलनीती ठरविण्यात सुद्धा डॉ . बाबासाहेबांची प्रमुख भूमिका आहे . अनेक महाकाय धरणे बांधण्यात ज्याला देशाचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक मंदिरे असे संबोधले.

१९३५ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली यासाठीसुद्धा व्यापक आर्थिक दृष्टिकोन अभ्यासाचा महत्त्वाचा वाटा आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार आधुनिक भारताला तारणारे आहे. सर्वांनी याच मार्गावर चालण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...