रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
गडचांदूर -गडचांदूर नगर परिषद चा चालू असलेल्या भोंगळ कारभारा बाबत भाजपाचे पक्ष्याचे नगर परिषद मधील विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी अनेकदा निवेदने दिले सभागृहात मागणी केली.परन्तु विरोधी नगरसेवकांच्या निवेदनाची कुठली दखल घेतली नाही वा कुठली माहिती पुरविली नसल्याने शेवटी विविध मागण्या घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वतीने व नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात दिनांक 13/4/2022 ला मोर्चा काढणार असल्याचे निवेदन मा नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांना दिनांक 6/4/2022 रोजी दिले.असता निवेदन मिळताच नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी खरे तर एक शिष्ठमंडळ बोलावून चर्चा करणे गरजेचे होते.तसे काहीही करण्याचे सुचले नाहीच परन्तु मोर्चात आलेल्या नागरिकांचे मोर्चा तील किमान उपस्थित राहून शिष्ठ मंडळा सोबत चर्चा करण्याचे सौभाग्य दाखवू शकले नाही.ही गडचांदूर वासींचे दुर्भाग्य म्हणावे की काय ? मोर्चा येताच नगराध्यक्षानी पलायन केले तर मुख्यधिकारी अनुपस्थित राहिल्या त्यामुळे यांना जनतेचे किती देणेघेणे आहे हे आज सिद्ध झाले.
आज रखरखत्या उन्हात शकडॉ महिला पुरुष नगर परिषद ला धडकल्या त्यांच्या भावना लक्ष्यात घेणे गरजेचे होते.गरिबांचे अतिक्रमण नियमानुकूल करिता प्रकरण मागील दोन वर्षे पूर्ण होऊनही धूळखात आहे.ही मागणी तात्काळ निकाली लावण्यात यावी.कोरोना मुळे अनेकांचे आर्थिक बजेट बिघडले त्यामुळे अनेकांचे न प चे कर थकले आहे.तेव्हा वेगवेगळ्या नियमाचा वापर करून न प कडून वसुली करणे गरजेचे असताना त्यांचा वापर न करता सरसकट सत्ताधाऱ्या नी थकबाकी कर धारका कडून 2% प्रति माह शास्ती (दंड) वसूल करण्याचा सत्ताधार्यानी सभागृहात निर्णय घेतला.व त्याची न प प्रशासन सक्तीने अमंलबजावणी चालू केली.मात्र वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदाराडुन दंड वसूल करणे गरजेचे असताना मात्र त्यांना सूट दिली जात आहे. त्यामुळे न प चे लाखो रुपये आर्थिक नुकशान होत आहे.शहरातील श्री छयत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व ओपन स्पेस सौंदरीकरन काम निधी उपलब्ध असताना सुद्धा मागील सहा सात महिन्या पासून बंद पडले आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे.
ते काम तात्काळ चालू करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.पंतप्रधान आवास योजनेची तिसरे अनुदान किस्त मागील दोन वर्षा पासून मिळाली नाही.नगराध्यक्ष तथा मुख्यधिकारी यांना अनेकदा पत्र व्यवहार करूनही त्यांना ना अनुदान ना उत्तर यामुळे लाभार्थी हैराण झाले आहे.घरबांधकाम करताना घेतलेले खाजगी सावकाराचे बोझे वाढले आहे.परन्तु न प शासन/प्रशासना कडून कुठली दखल घेतली जात नाही.बरेच लाभार्थानी घरबांधकाम चालू केले नसल्याने त्यांचे अनुदान न प च्या खात्यात जमा असताना तात्पुरती ते अनुदान या लाभर्थाना देन्याबाबत सभागृहात विषय घेत नाही.त्याबद्दलची मागणी वेळोवेळी होत असून लक्ष दिले जात नाही.विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील जोगी नगर,सम्राट नगरातील विकास काम जाणीव पूर्वक केल्या जात नाही.
अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव दोन वर्षे होऊनही उपविभागीय अधिकारी कार्यालयात पाठवू शकले नाही.दीड वर्षा पासून मंजूर असलेली बोरवेल मारल्या जात नाही.या सर्व मागणी करिता विरोधी नगरसेवक अरविंद डोहे यांनी पत्र व्यवहार नगराध्यक्ष तथा मुख्याधिकारी यांचे कडे तसेच सभागृहात मागणी करूनही कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.वा विरोधी नगरसेवकांना उत्तर दिल्या जात नसल्याने शेवटी विरोधी नगर सेवक डोहे व मोरे यांनी आपल्या भारतीय जनता पार्टी चे वतीने दिनांक 13/4/2022 रोजी मोर्चा काढला व पूर्व सूचना करूनही अनुपस्थित राहिल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
नागरिकांचा रोष पाहुण न प च्या कर्मचाऱ्यांनी मुख्यधिकारी यांचेशी सम्पर्क केला असता न प चे प्रशासकीय अधिकारी श्री शेडमाके व विभाग प्रमुखाशी बैठक लावण्यास सांगितल्या वरून मोर्चा तील शिष्ठमंडळ बोलावून बैठक आयोजित केली त्या मागणीतिल दोन काम तात्काळ चालू करण्यात येतील व काही काम एक हप्त्यात तर 2% प्रति माह लावण्यात आलेली शास्ती कमी करण्याबाबत ठराव सभेत घेण्याचे लेखी आश्वासन दिले.पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्था सोबत एक हप्त्यात लाभार्थी सोबत बैठक लावून त्यांचा प्रश्न निकाली लावण्यात येईल.
नियमा प्रमाणे ठेकेदाराकडून दंड वसून करण्यात येईल व बाकी मागणीकडे जातीने लक्ष घालून वेळोवेळी माहिती पुरविल्या जातील असे लेखी आश्वासन दिले आता नगर परिषद शासन प्रशासन किती गाभिर्याने घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...