खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
शेतकऱ्यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिल्याने अधीकाऱ्यांचा सीमांकनास नकार
तब्बल 5 वेळा मोजणी होवूनही प्रत्येक मोजणीत फरक : ग्रामपंचायत चे आमदारांना साकडे
चिमूर तालुक्यातील नेरी येथील स्मशानभूमी मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असून या स्मशानभूमीच्या जागेची हद्द कायम व्हावी याकरिता तब्बल 5 वेळा मोजणी करण्यात आली मात्र प्रत्येक मोजणीत फरक येत असल्याने भूमीअभिलेख कार्यालयाच्या कामावर संशय व्यक्त होत असून भूमिअभिलेख कार्यलयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आलेला आहे.
नेरी येथील स्मशानभूमीत अनेकांनी अतिक्रमण करून स्मशानभूमीची अर्ध्यापेक्षा जागा हळप केली त्यामुळे अंत्यविधी करीता जाणारे नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे,या संदर्भात दखल घेत ग्रामपंचायत नेरी यांनी मोजणी करून जागा खुली करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यलयात पैसे भरून मोजणी केली मात्र प्रत्येक मोजणीच्या खुणा वेगवेगवेगळ्या येत असल्याने मोजणीवर संशय निर्माण होत आहे.
दि.13.04.2021 ला स्मशानभूमी लागत असलेल्या कुरेशी यांनी मोजणी केली याकरिता भूमिअभिलेख कार्यालय चिमूर यांनी निलेश रायपूरे व सहकारी यांना पाठविले सुरुवातीस सदर स्मशानभूमीच्या जागेवर गाढलेले खांब योग्य असल्याचे त्यांनी सांगितले मात्र त्याचवेळेस शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टात जाण्याचा इशारा देताच अधिकाऱ्यांनी कुरेशी यांची जागा स्मशानभूमीकडे निघत असल्याचे सांगितल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केलेला असुन सदर स्मशानभूमीचे सीमांकान योग्य रित्या करून न्याय न दिल्यास गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांसह भूमिअभिलेख कार्यलयसमोर उपोषणाला बसणार असा इशारा दिला असून या गंभीर बाबीची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्यांना होणारा मानसिक त्रास बंद करण्यासाठी व 8.50 एकरचा सातबाऱ्याची जागा उपलब्ध करून देण्याकरिता आमदार साहेबाना निवेदन देण्यात आले आहे.
त्यामुळे अश्या बदलणाऱ्या मोजणीवर, मोजणी अधिकारी व मोजणी कार्यालयावर भरोसा कसा ठेवायचा असा प्रश्न निर्माण होत असून या मोजणीच्या अनुषंगाने भूमिअभिलेख कार्यलयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आलेला आहे असे व दिसते
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...