आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
पोंभूर्णा :-
पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी येथे रेती डंपीग साईडवर रेती भरून असलेल्या ट्रकला पोकलॅंडच्या मदतीने बाहेर काढत असताना झालेल्या अपघातात एका पोकलॅंड ऑपरेटरचा मृत्यू झाला. सदर घटना दि.११ एप्रिलला रात्री दिड वाजताच्या सुमारास घडली. भिमणी येथील घाटाचा लिलाव नसतांनाही तिथे डंपींग साईट तयार करून रेती उचल करण्यात येत होती.प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकून रेती घाट मालकांनी अवैधरित्या हा रेती उचल करण्याचा गोरखधंदा सुरू केले असल्याची ओरड परिसरातून होत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी येथे मागील काही महिन्यांपासून निलकंठ गिरसावळे यांच्या शेतात रेती डंपिंग साईडवर रेती स्टाक करणे सुरू होते. याच साईडवरून रेती हायवा, ट्रक व ट्रक्टर ने रेतीची उचल करण्यात येत होती.
दि.११ एप्रिलला रात्री दिड वाजताच्या सुमारास रेती भरलेला ट्रक डंपींग साईडवर फसला त्याला काढण्यासाठी पोकलेनच्या मदतीने काम सुरू होते. पोकलेन ऑपरेटर अमोल बबन नंदनकर रा.चंद्रपूर हा पोकलेनच्या खाली उतरून दुसऱ्या व्यक्तीला पोकलेन चालवायला दिला होता. मात्र ट्रकला बाहेर काढतांना पोकलेनचा बुम सरकल्यामुळे खाली असलेल्या ऑपरेटर अमोल ट्रक व पोकलेन च्या मध्ये फसला. यात त्याला जबर मार लागला. तात्काळ त्याला वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले मात्र बामणी जवळ त्याची प्राणज्योत मालवली. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटणेमुळे रेती घाटाचे संचालक तसेच संबंधित अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी नागरीकाकडुन केली जात आहे।मृतकाच्या परीवाराला 5 लाख रू नगद तसेच एकुण 30 रू देण्याची मंजूरी देण्यात आली।
सदर घटनेचे मर्ग चंद्रपूर सिटी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास घटनेचे कागदपत्रे प्राप्त होताच पोंभूर्णा पोलिस करणार आहेत.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...
** पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा...
पोंभूर्णा : हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली...