खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*तामिळनाडू- चेन्नई शहराच्या(परप्रांतातल्या) कचऱ्याची विल्हेवाट चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग,कुठलीही प्रक्रिया न करता बॉयलर मध्ये या कचऱ्याचा वापर करीत आहे,त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे.!*
*आज तामिळनाडूच्या चेन्नईहून आलेले २४ घाणेरड्या कचरा भरलेले ट्रक एसीसीत पकडले.*
*परवा दि. 9 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनी घुघूस/नकोडाच्या वाहनतळावर असलेल्या जवळपास 25 कचऱ्याच्या ट्रक पकडल्या, ज्यात अतिशय घाणेरडा व सडलेला,निकृष्ट दर्जाचा,कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा भरलेला होता, यात घाणेरडे चिखलाने भरलेले कपडे, मातीने माखलेल्या प्लॅस्टिकच्या पन्न्या,औषध टॅबलेट,औषधांची ऍल्युमिनियम पाकिटे, केसं,मेलेली जनावरं, लोखंड असा मिक्स असलेला आणि पूर्णतः सडलेला कचरा होता, या विरुद्ध राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दिलीप पित्तलवार, सुरेश पाईकराव, महेश लढ्ढा, यांनी लिखित तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन घुग्गुस येथे दिली,आज जिल्हा प्रदूषण विभागाच्या कार्यालयाला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी याविरुद्ध एक तक्रार दिली, त्यानुसार आज जिल्हा प्रदूषण विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. अ.पु.सातफळे क्षेत्र अधिकारी श्री.वी.ध. शुक्ला,सहा.पोलीस निरीक्षक संजय सिंग, आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,दिलीप पित्तलवार, सुरेश पाईकराव, महेश लढ्ढा,ए.सी.सी.चे प्रदूषण विभागाचे व्यवस्थापक व्ही.नागभूषण,सुरक्षा अधिकारी, या सर्वाच्या उपस्थितीत तक्रारीची शहानिशा करण्यात आली,या ट्रक मधील कचऱ्याची तपासणी करण्यात आली,प्रदूषण विभागाने घालून दिलेल्या नियमानुसार शहरांमधून निघणारा कचऱ्यावर प्रक्रिया करून प्लास्टिक वेगळे,कपडे वेगळे,औषधांचे अल्युमिनियम चे फॉयील वेगळे, असा कचरा वेगवेगळा करून त्याला लागलेली माती, घाण साफ करून स्वच्छ करून मग त्याला कॉम्प्रेस करून त्या कचऱ्याचे सॉलिड ब्लॉक करून असा कचरा बॉयलर मध्ये वापर करण्याची प्रदूषण मंडळाच्या २/०२/२०२२च्या पत्रानुसार परवानगी दिली आहे असं प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली,परंतु आज ज्या २५ ट्रकची तपासणी करण्यात आली, या कचऱ्यात,सडलेले नालीच्या घाणीत भरलेले कपडे,औषधांचे पाकीट,अल्युमिनियम फॉईल,केसं,प्लॅस्टिकच्या पन्न्या,लोखंड, माती,इत्यादी इत्यादी हे सर्व मातीने माखलेला कचरा प्रदूषण विभागाच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आला,आणि त्यांनी हा कचरा अजिबात वापरण्या योग्य नसल्याचे एसीसी च्या प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले,त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळास दिले,त्यात ए.सी.सी.सिमेंट उद्योगात अश्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा कुठलाही प्रकल्प नाही,त्यामुळे जसा कचरा आला तसा ही कंपनी बॉयलर मध्ये टाकून जिल्ह्यात व उद्योग परिसरात प्रदूषण वाढवीत आहे,त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने अश्या कचऱ्याचा वापर केल्याबद्दल ए सी.सी. व्यवस्थापणाविरुद्ध प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार कारवाही करावी अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली.*
*सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग असा निकृष्ट दर्जाचा स्वस्त दरात मिळणारा कचरा,त्यांच्या त्यांच्या उद्योगांच्या बॉयलर मध्ये वापरून आपले काम भागवत आह,आणि आपल्या जिल्ह्यात प्रदूषण पसरवीत आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कचरा न वापरता हे उद्योग आपला जिल्हा सोडा,महाराष्ट्र सोडा परराज्यातून म्हणजे तामिळनाडूच्या चेन्नई शहरातील कचरा आपल्या जिल्ह्यात आणून आपल्या जिल्ह्यात प्रदूषण पसरवीत आहेत.आणि चेन्नईच्या कचऱ्याची सोय लावत आहेत.*
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...