Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *12 एप्रिल रोजी जात प्रमाणपत्र...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*12 एप्रिल रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन*

*12 एप्रिल रोजी  जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन*

चंद्रपूर दि. 11 एप्रिल: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन दि. 12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जनता महाविद्यालय, सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. 
यानिमित्ताने चंद्रपुर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी तसेच अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विज्ञान शाखेच्या इयत्ता 11वी व 12वी मध्ये शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवितांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच विहित कालावधीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. याकरिता जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात येणाऱ्या अडचणींचा विचार करता मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
तरी, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच जात पडताळणीचा लाभ घेऊ इच्छिणारे नागरिक यांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा. असे आवाहन चंद्रपूर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी  समितीचे उपायुक्त तथा सदस्य  विजय वाकूलकर यांनी केले आहे. 
00000

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...