Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / आनंद निकेतन महाविद्यालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

आनंद निकेतन महाविद्यालयात नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन

आनंद निकेतन महाविद्यालयात नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन

मंगेश तिखट प्रतिनिधी: स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही.गेल्या तीसएक वर्षांपासून या दोघांमधील संबंध दृढ होत चालले आहेत. कालपर्यंत स्पर्धा परीक्षांना फारसे महत्त्व नाही म्हणणारे आता ‘स्पर्धा परीक्षांशिवाय पर्याय नाही’ असे म्हणताना दिसत आहेत.वाढत्या स्पर्धेचे महत्व लक्षात घेऊन महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

नेट,सेट व गेट परीक्षेतील प्राविण्यप्राप्त स्वप्नील सहारे व नितीन कळंबे हे या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.नेट ,सेट परीक्षेच्या तयारी साठी लागणारे धोरण व परीक्षेसंबंधी इतर बारकावे या विषयांवर याप्रसंगी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली व परीक्षेसंदर्भात असलेल्या इतर समस्या विद्यार्थ्यांच्या प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी  उस्फुर्तपणे या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला व परीक्षेचे सर्व बारकावे समजून घेतले.

कार्यक्रमाला उपस्थित डॉ. मृणाल काळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. डॉ. अरविंद सवाने, महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या . डॉ. रामदास कामडी, डॉ. संयोगिता वर्मा, प्रा. हेमंत परचाके यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली. डॉ. प्रशांत वाघ यांनीही उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची शोभा वाढविली. कु. योगिनी लोणकर हिने कार्यक्रमाचे संचालन केले व प्रा. तिलक ढोबळे यांनी आभार व्यक्त  केले.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...