Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राजुरा येथे महसूल कर्मचाऱ्यांचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राजुरा येथे महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप || रक्तदान करीत संपात सहभागी; महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना संपावर.

राजुरा येथे महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप || रक्तदान करीत संपात सहभागी;  महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना संपावर.

राजुरा :  शासन स्तरावर मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करूनही न्याय होत नाही, अव्वल कारकुन संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मागील दोन वर्षापासून होत नसल्याने तसेच महसूल सहायकाचे रिक्त असलेली पदे भरण्यास शासनाकडून होत असलेली प्रलंबितता व महसूल कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या  संदर्भात शासनाची असलेली उदासिनता या कारणास्तव, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आज राजुरा तहसील कार्यालयासमोर रक्तदान करीत बेमुदत संप पुकारला आहे.

यापूर्वी अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याचे दिसून येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 10 मे 2021 अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून यांच्या सेवाज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे. एकत्रित करण्याची प्रक्रीया ही अन्यायकारक असल्याने सदर पत्र तात्काळ रद्य करावे. राज्यातील महसूल विभागात (जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, व तहसील कार्यालय) महसूल सहायकाची पदे मोठया प्रमाणात रिक्त असून, एका महसूल सहायकाकडे दोन ते तीन कार्यासनाचा अतिरीक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तनावत असून, महसूल सहायक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील भरती करणेस टाळाटाळ करण्यात येत आहे. संघटनेने इतर मागण्याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन मिळत आहे. आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने आंदोलनात चंद्रपूर जिल्हयातील पदोन्नत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहायक, व शिपाई संवर्गातील एकुण अंदाजे पाचशे कर्मचारी सहभागी होऊन मागण्याची पूर्तता होत नसल्याने यापूर्वी चोवीस मार्च ला काळ्या फिती लावून काम केले, त्यानंतर अठ्ठावीस मार्च ला एक दिवसीय लाक्षणीक संप पुकारला मात्र शासन याची दखल घेत नसल्याने 
नाईलाजास्तव आज (दि. ४) पासून राजुरा येथील तहसील कार्यालयासमोर रक्तदान करीत बेमुदत संप पुकारला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...