Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांवर...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी || उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना पत्रकार शिष्टमंडळाचे निवेदन.

लाचखोर महसूल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी || उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना पत्रकार शिष्टमंडळाचे निवेदन.

क्रिष्णा वैद्य ब्रम्हपुरी :- १२ मार्च २०२२ ला तालुक्यातील तोरगाव गावा जवळ रात्रौ ११ वाजताच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहणांवर शासकीय नियमावली नुसार कुठलीही कारवाई न करता तालुक्यातील ३ तलाठी कर्मचाऱ्यांनी ९६ हजार रुपयाचे परस्पर आर्थिक व्यवहार करीत आपसी समझोत्याने पाहार्णी येथील दोन तर तोरगाव येथील एक वाहन सोडून दिल्याची लेखी तक्रार स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना देतं, लाचखोर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व तस्करीला लगाम यावा अशी विनंती केली होती. तर याबाबत स्थानिक वृत्तपत्रांमधून बातम्या ही प्रकाशित झाल्यात मात्र सदर कर्मचाऱ्यांवर कुठली ही कार्यवाही झाली नाही.

तसेच कुर्झा हनुमान मंदिर जवळ २७ मार्च ला रात्रौ ११ वाजताचे दरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाच्या उर्मट वागणुकीने शुन्य रॉयल्टी असलेला वाहन स्थानिक नागरिकांनी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे लावला असता, उलट या नागरिकांनाच अपमानास्पद वागणूक देउन रात्रौ १२ वाजताच्या नंतर वेळवर आणलेली रॉयल्टी ग्राह्य धरत वाहन सोडून देण्यात आले.

अवैध वाळू तस्करी करीत महसूल बुडवणाऱ्या वाहण धारकासह परस्पर आर्थिक व्यवहार करीत लाचखोरी केल्याने सदर प्रकरणामुळे तालुक्याच्या प्रतिमेला महसूल प्रशासनाच्या लाचखोरीने धक्का लागला असून तालुक्याची सर्वत्र बदनामी होत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी तक्रार ब्रम्हपुरी तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना तक्रार, निवेदन देऊन केली असून प्रशासन लाचखोरांची पाठराखण करणार अथवा कायदेशीर कारवाई करणार हे पाहणे आता तालुक्यातील नागरिकांसाठी औचित्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...