वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे 4.5 वर्षे वयाचा टी 161 हा नर वाघ दि . 30 मार्च 2022 रोजी सकाळी 8 वाजता आंबेउतारा नियतक्षेत्र , रानतळोधी- कारवा रेंजमधील वन क्षेत्र क्रमांक 290 मधील आंबेउतारा ओढ्यात मृतावस्थेत आढळून आला.
त्याला 2019 मध्ये कॉलर लावण्यात आली होती. मात्र, काही काळानंतर सिग्नल बंद पडली. दरम्यानच्या काळात कॅमरा ट्रॅप मध्ये अधून मधून फोटो प्राप्त होत होते. त्यात त्याच्या गळ्याला जखम दिसून आली. 29 मार्च रोजीही आंबेउतारा ओढ्याजवळ हा वाघ दिसला होता. मात्र त्याला पकडता आले नाही. दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 8 वाजता शोधकार्यात असणा - या पथकाला नाल्यात वाघाचा मृतदेह आढळला. शव विच्छेदनाकरीता त्याला चंद्रपूर येथील तात्पुरत्या उपचार केंद्रात नेण्यात आले. डॉ. एकता शेडमाके , डॉ . राहुल शेंद्रे, डॉ . कुंदन पोडचेलवार यांनी शवविच्चेदन केले.
यावेळी क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक श्री . नंदकिशोर काळे, वनाधिकारी महेश खोरे, कृष्णापूरकर, श्री . रामटेके उपस्थित होते .
तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांचे प्रतिनिधी म्हणून श्री . बंडू धोत्रे व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून श्री . मुकेश भांदककर हेही शवविच्छेदनाच्या वेळी उपस्थित होते . शवविच्छेदनाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे रक्तदोष उद्भवला. वाघाचे अंतर्गत अवयव पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...