Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

परीक्षा पे चर्चा’ 1 एप्रिल रोजी होणार, पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

चंद्रपूर दि. 30 मार्च: आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांना आलेला परीक्षेचा तणाव दूर करणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी होणाऱ्या पंतप्रधानांच्या या संवादाचे डीडी नॅशनल, डीडी न्यूज, फेसबुक या प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारण केले जाणार आहे. त्यासोबतच जवाहर नवोदय विद्यालय, बाळापूर, तळोधी यांच्यामार्फत देखील फेसबुक, ट्विटर व यूट्यूबच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे बहुउद्देशीय सभागृहांमध्ये “परीक्षा पे चर्चा” या संवादाचे थेट प्रसारण दाखवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक जबाबदार पालक या नात्याने आपल्या पाल्याच्या तणावमुक्त परीक्षांसाठी उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक या संवादाच्या माध्यमातून केल्या जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा पे चर्चा या विषयावर जिल्हयातील शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी व कार्यक्रम होतील, त्या सर्व कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ 10 एप्रिलपर्यंत प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय बाळापूर, तळोधी यांच्याकडे पाठवावेत.

तरी, जिल्ह्यातील सर्व शाळांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन माध्यमातून उपस्थिती दर्शवावी. असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य मीना मणी यांनी केले आहे.

000000

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...