वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: परिसरातील दिव्यांग बांधवाना 5% निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मागील दोन वर्षांपासून घुग्घुस परिसरातील अनेक दिव्यांग बांधवाना शासनाचा 5% दिव्यांग निधी मिळाला नाही त्यामुळे संतप्त दिव्यांग बांधवानी येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या व्यथा सांगितल्या ही समस्या लक्षात घेत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी अनेक दिव्यांग बांधवासह मुख्याधिकारी अर्शीया जुही यांची नप कार्यालयात जाऊन भेट घेतली व चर्चा केली. सकारात्मक प्रतिसाद देत मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी सन 2021-2022 ते 2022 ते 2023 मागील दोन वर्षाचा 20 एप्रिल पर्यंत 5% निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले चर्चे नंतर निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले दिव्यांग बांधवांवर होणारा अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही मागील दोन वर्षांपासून दिव्यांग बांधवाना निधी मिळत नाही ही लाजिरवाणी बाब आहे दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहो. दिव्यांग बांधवांच्या मागण्याची तत्काळ दखल घेत 20 एप्रिल पर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी दिल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
निवेदन देतांना भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, साजन गोहने, शाम आगदारी, असगर खान, व दिव्यांग बांधव उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...