वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): स्थानिक श्री चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपुर द्वारा संचालित चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 2021-22 या शैक्षणिक सत्रामध्ये *“कोरोना व मतदान जनजागृती करिता युवाशक्ती”* या संकल्पनेवर आधारित दिनांक 20 मार्च 2022 ते 26 मार्च 2022 या कालावधीत सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन म्हातारदेवी येथे करण्यात आले. शिबिराचा उद्घाटन समारोह दिनांक 21 मार्च 2022 रोज सोमवारला सकाळी 11.30 वाजता करण्यात आले. यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर कुंभारे हे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ. संध्याताई पाटील, सरपंच ग्रामपंचायत म्हातारदेवी ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शंकरजी उईके उपसरपंच म्हातारदेवी, माननीय श्री अजयजी कोयचाळे पोलीस पाटील ग्रामपंचायत म्हातारदेवी, माननीय श्री संदीप चांभारे ग्रामपंचायत सदस्य म्हातारदेवी, माननीय श्री साळवे सर, माननीय श्री राजेश उगले ग्रामसेवक ग्रामपंचायत म्हातारदेवी व इतर ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते.
सहाय्यक प्रा. डॉ. नितीन बी. कावडकर व सहाय्यक प्राध्यापक मंगेश जमदाडे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विचार मंचावर उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर कुंभारे सर यांनी स्वयंसेवकांनी गावातील विविध समस्या जाणून घ्याव्यात त्या समस्या स्वतः व गावकऱ्यांच्या सहकार्याने दूर करण्याचा प्रयत्न करावेत गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास होय. गावाचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास साधता येईल.असे आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रतिपादित केले.
दिनांक 22 मार्च 2022 ला कार्यक्रम पत्रिकेनुसार दैनंदिन कार्यक्रमात सकाळी 5.00 वाजता जागर 6 ते 7 वाजता मेडिटेशन, व्यायाम व प्राणायाम, 7 ते 8 वाजता नाश्ता, 8 ते 11 वाजता, श्रमदान 12 ते 1वाजता भोजन, 2 ते 4 वाजता विविध बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 22 मार्च 2022 ला बौद्धिक सत्रात जीवनात खेळाचे महत्व या विषयावर डॉ. चंद्रशेखर कुंभारे यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध खेळ खेळल्याने मानवाचे आरोग्य सुदृढ राहून निरोगी व चांगले जीवन जगता येतो असे सांगून मानवी जीवनात खेळाचे महत्व स्पष्ट केलेत. तसेच त्यांनी काही खेळायचे प्रात्यक्षिक करून दाखविले. 5.30 ते 6.30 वाजता मैदानी खेळ खेळण्यात आले. 07. ते 08 भोजन व 08 ते 10 वाजता समाज प्रबोधनपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तर 10.15 वाजता विश्रांती असे शिबिराची दिनचर्या होती.
दिनांक 23 मार्च 2022 रोज बुधवार ला दुपारी 2 ते 4 वाजता व्यक्तिमत्व विकास या विषयावर डॉ. रवी धारपवार राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन पर बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम व्यासपीठ असल्याचे डॉ. रवी धारपवार सर यांनी प्रतिपादित केले. दिनांक 24 मार्च 2022 रोज गुरुवार ला दुपारी 2 ते 4 वाजता बौद्धिक सत्रात वर्तमान काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व या विषयावर माननीय श्री संदीप चांभारे, संचालक आयटीपी घुग्घूस यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक युगात जगताना प्रत्येक विद्यार्थ्यांना व व्यक्तीला तंत्रज्ञान अवगत असणे का गरजेचे आहे हे विविध उदाहरण देऊन समजावून सांगितले.
दिनांक 25 मार्च 2000 रोज शुक्रवार ला 11.00 वाजता समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. चंद्रशेखर कुंभारे प्राचार्य चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस हे उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री शंकर उईके, उपसरपंच ग्रामपंचायत म्हातारदेवी, माननीय श्री अजय कोयचाळे, पोलीस पाटील ग्रामपंचायत, म्हातारदेवी माननीय श्री संदीप चांभारे सदस्य, ग्रामपंचायत म्हातारदेवी, माननीय श्री राजेश ऊगले ग्रामसेवक ग्रामपंचायत, म्हातारदेवी, डॉ. रवी धारपवार, डॉ. माधव कांडणगिरे, प्रा. संतोष गोहोकार, प्रा. महेंद्र कुंभारे, प्रा. गणेश सुरजुसे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नेहा पाटील हिने केले तर आभार पायल लोंढे हिने मानले.
शिबिराच्या यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतर सर्व नागरिकांनी मोलाचे सहकार्य केलेत.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...