आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती :
जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शिरना नदीच्या काठावरील वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड चे ओव्हर बर्डन 22 मार्च पासून कोसळू लागल्याने 200 मीटर अंतरावर असलेल्या पळसगाव व नजीकच्या नागलोन गावाचे 'माळीण' तर होणार नाही ना...?अशी चर्चा सुरू आहे.असे घडले तर याला जवाबदार कोण..?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चंद्रपुर जिल्हा कोळसा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.काही वर्षांपूर्वी भूमिगत खाणी बंद करून,खुल्या खाणी(ओपन कास्ट) तुन कोळसा उत्पादन केले जाते.2016 मध्ये माजरी वेकोलीक्षेत्रातील एका भूमिगत खाणीचे खुल्या खाणीत रूपांतरण करण्यात आले.यासाठी ओव्हर बर्डन(माती व दगड) काढून ते शिरना नदी पासून काही अंतरावर टाकण्यात आले.मातीचा हा उंच 90 मीटर ढिगारा कोसळू लागला.त्या मातीच्या दाबामूळे शिरना नदीचे पात्र 20 फूट उंच उठले हेच नाही तर परीसरातील जमिनीला भूकंप झाल्यागत मोठया खोल भेगा पडल्या.हा प्रकार 22 मार्चच्या रात्री घडल्या नंतर 23 मार्चला उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली.घटनेच्या 7 व्या दिवशी दै नवराष्ट्रने स्पॉट सर्व्हे केला असता स्थिती जैसे थे होती.
*माळीण होण्याची शक्यता*
पुणे पासून काही अंतररावर असणाऱ्या अंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव चिखलात दबले.दिनांक 30 जुलै 2014ला सकाळी माळीण गावच्या डोंगरात स्फोटकसदृष्य आवाज झाला, मातीचा ढिगारा, चिखल व उन्मळलेली झाडे अचानक खाली घसरून येवू लागली. डोंगर कोसळला, दरड कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली मूळ गावातील 74 पैकी 44 घरे दाबली गेली. जवळजवळ संपूर्ण गाव क्षणार्धात गायब झाले.हीच स्थिती पळसगाव व नागलोनची आहे.वेकोलीचे ओव्हर बर्डन म्हणजे निव्वळ माती आहे.मातीच्या या उंच डोंगरावर पाणी जमा होऊन तयार झालेले शेवाळ खाली आल्याचे स्पष्ट दिसत आहे.या डोंगर भोवती असलेली सुरक्षभिंत भेदून माती खाली येत आहे.यावर वेळीच उपाय योजना न केल्यास येणाऱ्या पावसाळ्यात त्या मातीचे चिखलात (मड फ्लो)रूपांतरण होऊन माळीणची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
*अधिकाऱ्यांनी केली घटनास्थळाची पाहणी*
ओव्हर बर्डनमूळे नदीचे पात्र उंचावण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला.सोमवारी भद्रावती तहसीलदार अनिकेत सोनवणे,वेकोली माजरीचे उपक्षेत्रीय प्रबंधक आर बी वर्मा,एमपीसीबीचे सातफळे,संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी घटनास्थळी भेट दिली.वेकोली अधिकाऱ्यांनी आमच्या कडे सर्व परवानग्या आहेत,असे सांगत तो मी न्हवेचची भूमिका घेतली.याच वेळी काही ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.नदीचे पात्र पूर्ववत करून देण्याचा सूचना तहसीलदार व सातफळे यांनी केल्या.तर वेकोली अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंट ऑफ मायनींग सेफ्टी (डिजीएमएस) च्या सुचने प्रमाणे काम करू म्हंटल्याने,आता नेमके काय होणार हे बघण्यासारखे असणार आहे.
*संजीवनी पर्यावरण संस्थेचा आंदोलनाचा इशारा*
वेकोली अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत वेकोलीचे चुकले नाही हे दर्शविण्याचा असफल प्रयत्न केला.यामुळे तेथे उपस्थित गावकरी व संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले संतापले.या प्रश्नावर कायम तोडगा न काढल्यास कोळसा उत्पादन बंद करू,आंदोलन करू असा इशारा दिला.यावर वेकोली अधिकाऱ्यांनी जे करायचे ते करा,म्हंटल्याने गावकरी संतापले आहे.
*कोराडी नाला अडवल्याने निर्माण झाला धोका*
वेकोलीने भूमिगत खान बंद करून न्यु माजरी अंडर ग्राउंड ओपन कास्ट खाण सुरू केली.त्यावेळी शिरना नदीला जोडणाऱ्या कोराडी नाल्याला परिवर्तित करण्यात आले.त्याच नाल्याच्या ओल्या जागेवर ओव्हर बर्डन टाकण्यात आले.त्याचा दाब ओली माती सहन करू शकली नाही म्हणून उंच ढिगारा जमिनीत दबला.आणि ही घटना घडली,अशी माहिती अनेक गावकऱ्यांनी दिली.
*पटबंधारे विभाग सुस्त*
सामान्यतः नदी,नाले व पाणी हे क्षेत्र शासनाच्या पटबंधारे विभागात येते.शिरना नदीचे पात्र उंच उठले,नदीचा प्रवाह थांबला,याची माहिती संजीवनी पर्यावरण संस्थेने पटबंधारे विभागाला दिली,परंतू 6 दिवस लोटूनही या विभागाने दखल घेतली नाही.हे विशेष.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
अवैध दारू पकडली म्हणून पोलीस पाटलांना लाथ - बुक्क्यांनी मारहाण भद्रावती तालुक्यातील मासळ येथील घटना राजेश...
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*घराघरात आणि गावागावा शिवसैनिक उभा करा : संपर्कप्रमुख प्रशांत कदम* *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने...