Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / गडचांदुरात आमदार चषकाचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

गडचांदुरात आमदार चषकाचे थाटात उद्घाटन राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल संघांचा समावेश

गडचांदुरात आमदार चषकाचे थाटात उद्घाटन   राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल संघांचा समावेश

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):

गडचांदूर - आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारातून दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे राष्ट्रीय स्तरावरील वालीबाल सामन्यांचे आमदार चषक आयोजित करण्यात आले असून नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला.
     राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आमदार चषक - २०२२ चे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत महिला व पुरुष असे दोन गट करण्यात आले असून महिला गटात देशातील पुणे, जबलपुर, आग्रा, पंजाब, गुजरात, चंद्रपूर, यवतमाळ, हैदराबाद, दिल्ली येथील संघांनी सहभाग घेतला आहे. तर पुरुष गटात देशातील कामठी, पंजाब, यवतमाळ, नागपूर, विजयवाडा, विशाखापट्टनम, महाराष्ट्र स्पायकर, हैदराबाद येथील संघांनी सहभाग घेतला आहे.
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे उपस्थित होते तर स्वागताध्यक्ष म्हणून गडचांदूर येथील नगराध्यक्ष सविता टेकाम उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, शुभांगी धोटे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, नगरसेविका अर्चना वांढरे, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता चिताडे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोयर, डॉ. कुलभूषण मोरे विजय डाहूले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, माजी सरपंच शिवकुमार राठी, माजी सरपंच बाबाराव पुरके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे, रोहित शिंगाडे, अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख अहमदभाई, पंडित काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
   आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, गडचांदूरसारख्या शहरात पहिल्यांदाच आमदार चषक आयोजित करण्यात आले असून यामुळे शहराचे नावलौकिक झाले आहे. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या व्हॉलीबॉल संघाचे त्यांनी यावेळी स्वागत व कौतुक केले.
      कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले तर प्रास्ताविक दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे सचिव विक्की मुन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विनोद तराळे, भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्थेचे अध्यक्ष राहुल उमरे यांच्यासह सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...