Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / आरोग्य शिबीर हे सेवेचे...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

आरोग्य शिबीर हे सेवेचे माध्यम - आ. किशोर जोरगेवार.

आरोग्य शिबीर हे सेवेचे माध्यम - आ. किशोर जोरगेवार.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घुग्घूस येथे भव्य नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन, १२०० रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

 कामांबारोगरच सामाजिक उपक्रमही गरजेची असून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या जात आहे. क्रिडा, सांस्कृतीक, शैक्षणीक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रावरही आमचा भर आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ  राहावे याकरिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित केल्या जात असून खर पाहता आरोग्य शिबिर हे सेवेचेच माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 यंग चांदा ब्रिगेड घूग्घूस शाखेच्या वतीने घुग्घूस येथील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भव्य नेत्रचिकित्सा व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला l  म्हातारदेवीच्या सरपंचा संध्या पाटील, म्हतारदेवी ग्रामपंचायत सदस्य प्रिया गोहणे, नकोड्याच्या ग्रामपंचायत सदस्य, ममता मोरे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवा नेते पंकज गुप्ता, बहुजन महिला आघाडी घुग्घूस शहर अध्यक्ष उषा आगदारी, आदिवासी महिला आघाडी शहराध्यक्ष उज्वला उईके, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते ईमरान खान, प्रेम गंगाधरे, मुन्ना लोढे, स्वप्निल वाढई, अन्वर सय्यद, राजू नातर आदिंची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेड हि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचली आहे. चंद्रपूरसह घुग्घूस शहरातही संघटनेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे. कोरोना काळात संघटनेने कौतुकास्पद काम केले. सोबतच नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दिशेनेही आमचे प्रयत्न सुरु आहे. आजवर यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही विविध भागात 80  हून अधिक आयोग शिबिरांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी मोठे आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस असल्याचेही ते यावेळी म्हणाले. बदलत्या युगात मोबाईल आणि टिव्हीच्या अतिवापराचा दुष्परिणाम डोळ्यांवर होत आहे. त्यामुळे घुग्घुस येथे हा भव्य नेत्रचिकित्सा शिबिर आणि चष्मे वाटप कार्यक्रम आपण येथे आयोजित केला. या शिबिराला घुग्घूस वासीयांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यामूळे पूढेही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून जनहिताचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
 आज पार पडलेल्या आरोग्य शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या १२०० नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली यातील 900 रुग्णांना सदर शिबिरात निशुल्क चष्मे वितरीत करण्यात आले तर पात्र  ठरलेल्या 80 रुग्णांवर सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीया बिंदुची निशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...