Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *पांढरपेशी गुन्हा हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*पांढरपेशी गुन्हा हा देशाच्या प्रगतीस अडथळा* *डॉ. दिलीप खैरनार*

*पांढरपेशी गुन्हा हा देशाच्या प्रगतीस अडथळा*              *डॉ. दिलीप खैरनार*

 

मंगेश तिखट ( कोरपना तालुका प्रतिनिधी):
राजुरा
    श्री शिवाजी कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालय राजुरा, समाजशास्त्र विभागाद्वारे "भारतीय समाजातील पांढरपेशीय गुन्हा व त्याचा देशाच्या विकासावरील प्रभाव" या ज्वलंत विषयावर आंतर विद्याशाखीय एक दिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. 
  या परिषदचे उद्घाटन मा. डॉ. श्रीराम कावळे, प्र. कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या हस्ते झाले. तर बीज भाषक म्हणून डॉ. दिलीप खैरनार, उपप्राचार्य औरंगाबाद हे होते. ते विविध क्षेत्रातील डोकेदुखी ठरणाऱ्या पांढरपेशीय गुन्हेगारी बाबत आपले मत व्यक्त केले. पांढरपेशीय गुन्हेगारीला आपण तत्त्वता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पांढरपेशीय गुन्हेगारीत वाढ होत आहे. यामुळे देशाच्या प्रगतीत अडथळा निर्माण झालेला आहे. यावर जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत यावर ठोस उपाययोजना करता येणार नाही असे परखड मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड हे होते. ते बोलतांना सर्वांनी आत्मपरीक्षण करून देशासाठी आपल्या जीवनाची आहुती देणाऱ्या देशभक्तांची आठवण करावी, त्यांच्या आत्म्याला या वाढत्या भ्रष्टाचारामुळे कसे वाटत असेल याचे भान ठेवून सदमार्गाने वागावे असे मत व्यक्त केले.  
       तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. श्याम खंडारे हे होते तर तांत्रिक सत्राच्या प्रमुख वक्त्या म्हणून मा. प्राध्यापिका संगीता कुमार, आग्रा (युपी) या होत्या. त्या बोलतांना पांढरपेशीय गुन्हेगारीबाबत लोक बोलायला घाबरतात. अन्यायाविरुद्ध बोलणे हे सुध्दा न्याय मिळवून देण्यासारखे आहे. त्यामुळे या गुन्हेगारीबाबत व्यक्त होणे गरजेचे आहे अशा त्या मत व्यक्त केल्या. 
     देशातील विविध राज्यातून अनेक प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी यांनी पांढरपेशीय गुन्हा यावर शोधनिबंध समाजशास्त्र विभागाकडे जमा केले गेले. शोधनिबंध लवकरच प्रसिद्ध जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यापैकी उत्कृष्ठ चार शोधनिबंध परिषेदेत सादर करण्यात आले. त्यापैकी एक शोधनिबंध उत्कृष्ठ शोधनिबंध म्हणून तांत्रिक सत्राचे अध्यक्ष मा. डॉ. श्याम खंडारे यांनी , डॉ. विनोदकुमार यादव, अरुणाचलप्रदेश याची निवड केली.
   परिषदेचे प्रास्ताविक डॉ. राजेश खैरणी, उपप्राचार्य यांनी केले तर तर सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल शा. आत्राम, समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केली तर उद्घाटन सत्राचे आभार प्राध्यापिका अंजली वारकड यांनी मानल्या तांत्रिक सत्राचे आभार प्रा. व्यंकटरमन यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ. मल्लेश रेड्डी, प्रा.डॉ. संजय शेंडे, प्रा. डॉ. अरुण चिलके, डॉ. अनिता रणधीर, प्रा. विश्वास शंभरकर, डॉ. प्रमोद वसाके यांनी मेहनत घेतली. राष्ट्रगीतांनी परिषदेची सांगता करण्यात आली.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...