Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / शेतीपूरक प्रक्रिया...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

शेतीपूरक प्रक्रिया क्षेत्रात संधी उद्योजकांनी पुढाकार घेण्याची गरज पाशा पटेल

शेतीपूरक प्रक्रिया क्षेत्रात संधी उद्योजकांनी पुढाकार घेण्याची गरज पाशा पटेल

                 मंगेश तिखट ( कोरपना तालुका प्रतिनिधी ):चंद्रपूर जिल्हा वन वैभवाने व वन उपज तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख आहे या जिल्ह्यामध्ये प्रदूषण वाढ बदलत्या हवामानात बरोबर वाढलेले तापमान आयपीसीसी शास्त्रज्ञाचा अहवाल देशपातळीवर चिंतन करण्यास भाग पाडणारा भविष्यात मानव जातीवर होणाऱ्या परिणामाचे संकेत दिले आहे बदलत्या हवामानात बरोबर पर्यावरणाचे संतुलन राखण्याची नितांत गरज निर्माण झाली पृथ्वीवर वाढते तापमान वातावरणातील बदलाचे शास्त्रज्ञांनी संभाव्य धोका ओळखून भूगर्भातील कोळसा खनिजाचे उत्खनन यामुळे वातावरणात कार्बन आ क्साईट वाढते प्रमाण ही चिंता वाढवणारी चंद्रपूर जिल्हा सुपीक जमिनीचा कोळसा व इतर खनिजाचे खान असलेला व एकीकडे हिरव्या शाळुने डोलणारा जिल्हा मात्र अलीकडे  प्रदूषणामध्ये देश पातळीवर  क्रमांक क्रमांक मिळवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण केली आहे बांबू पासून अनेक प्रकारचे उत्पादन करून मार्केटिंग करण्यासाठी जागतिक पातळीवर संधी उपलब्ध झाली आहे वन उपज बांबू शेती पूरक जोड व्यवसाय म्हणून बांबू प्रक्रिया उद्योग उभारून आर्थिक व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल एवढी क्षमता बांबू प्रक्रिया उद्योगामध्ये असल्याचे मत शेतकरी नेते व केंद्रीय ग्राम विकास समिती सदस्य पाशा पटेल यांनी व्यक्त केले चंद्रपूर येथील एन डी हॉटेलमध्ये उद्योजक व व्यापारी यांच्या संवाद सभेत बोलत होते यावेळी माजी आमदार संजय धोटे पृथ्वी रक्षक समिती सदस्य आबीद अली उपस्थित होते ते पुढे म्हणाले जिल्ह्यात बांबू लागवड करिता पोषक वातावरण निर्माण होत असून अनेक शेतकरी बांबू लागवडी चा मार्ग स्वीकारीत आहे वनक्षेत्र मध्ये असलेले बांबू चा उपयोग कापड फर्निचर व इतर साहित्य निर्माण करण्याला वाव आहे उद्योजकांनी संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे केंद्र शासन राज्य शासनाच्या योजनेतून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड तसेच या जिल्ह्यात प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण होऊ शकते पेपर मिल व वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये बांबू हे वापरल्या जाणार असल्याने शासनाने यासाठी लागवड व प्रक्रिया करिता सवलती दिलेल्या आहेत त्याचाही लाभ घेता येईल येथील व्यापारी अशोक हस्सानी यांनी आयोजित केलेल्या उद्योजक संवाद कार्यक्रमात बांबु निर्मिती साहित्यांचे व बांबू लागवडीतील भविष्यातील आर्थिक फायदा विषयक सादरीकरण करण्यात आले यावेळी विजय आईंचवार डॉक्टर सुशील मुंदडा विदर्भ व्यापारी संघाचे मधुसूदन रुंगठा रंजन नागुलवार मुकेश राठोड प्राध्यापक वैद्य प्रदीप बुक्कावार यांच्यासह बांबूपासून कापड निर्माते कासवाजी कॅन बँकचे संजीव करपे यांचेसह मोठ्या प्रमाणात व्यापारी सहभागी झाले होते

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...