Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / जिल्हा अन्न तसेच निरोगी...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक*

जिल्हा अन्न तसेच निरोगी आहार समिती तथा जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक*

चंद्रपूर दि.25 मार्च : शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांचेमार्फत राज्य व जिल्हा स्तरावर अन्न सुरक्षा व  मानके अधिनियम  2006 ची प्रभावी अंमलजबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण करण्याकरीता गठीत समित्यांची पुनर्रचना करुन सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने, जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत केलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेवून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाने सन 2021-22 मध्ये एकूण 246 नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यापैकी 101 नमुने प्रमाणित, 5 नमुने कमी दर्जाचे, 2 नमुने लेबलदोषाचे घोषित झाले आहेत. तर 16 नमुने (प्रतिबंधित अन्न पदार्थ) असुरक्षित घोषीत असून 122 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे समितीचे सदस्य सचिव श्री.मोहिते यांनी सांगितले. तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत एकूण 7 परवाना व नोंदणीचे कॅम्प घेवून या वर्षी 5472 अन्न परवाना,नोंदणी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले आहे. सदर उपक्रमांतर्गत मागील वर्षी अस्तीत्वात असलेल्या एकूण परवाना, नोंदणी संख्येत 58 टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच रिपर्पज युज्ड कुकिंग ऑइल मोहिमेअंतर्गत एकूण 59 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या असून सदर रेस्टॉरंटच्या तपासणीच्या वेळी 1 अन्न आस्थापनेत टिपीसी मिटरवरील रिडींग 25 पेक्षा जास्त आढळून आले असल्याने त्या आस्थापनेविरुध्द न्यानिर्णय दाखल करण्यात आला आहे. प्रशासनामार्फत विविध अन्न आस्थापनांना केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत मानांकित ऑडिटर्स द्वारे एकूण 250 अन्न व्यावसायीकांना अन्न पदार्थ हाताळणीचे व स्वच्छतेचे तसेच कोवीड संक्रमण काळात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सदस्य सचिव श्री. मोहिते यांनी सांगितले. तसेच ईट राईट चॅलेंज दरम्यान एकूण 28 हॉटेल, रेस्टॉरंट यांना हायजीन रेटींग घेण्यास उद्यूक्त केल्याचेही सदस्य सचिव श्री. मोहिते  यांनी सांगितले.

सदर बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रिपर्पज युज्ड कुकिंग ऑईलची मोहिम तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत इतर मोहीमा यशस्वीपणे राबविण्यात याव्यात याकरीता अन्न व औषध प्रशासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या मोहीम व कारवाईंना तसेच जनजागृतीपर कार्यक्रमांना व्यापर प्रसिध्दी देण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर यांनी दिले.

सदर बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह), राधिका फडके, सदस्य सचिव तथा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीकराम भराडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल देशमुख, जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयाचे एस. एम. मादीलवार, आरती केशववार, अन्न पदार्थ व्यावसायिक प्रतिनिधी प्रशांत चिटमूरवार, अन्न सुरक्षा अधिकारी  श्री. टोपले, श्री. उमप, श्री. सातकर प्रामुख्याने उपस्थित होते.

000000

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...