खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
शुक्रवार, दि. २५ मार्च.
राज्यात धान उत्पादक शेतकर्यांच्या धानाला बोनस देण्याची पद्धत २०१३ सालापासून सुरू होती, परंतू यावर्षी मविआ सरकारने शेतकर्यांना बोनसची रक्कम देण्यासाठी अद्यापही शासनस्तरावर कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया अशा धान उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकर्यांना त्वरित बोनस देण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाभर निदर्शने आंदोलन पार पडले.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात चंद्रपूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देत आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर, जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेसह शिष्टमंडळाने उप जिल्हाधिकारी श्रीमती अश्विनी मांजे यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन पाठविले.
याप्रसंगी बोलतांना, राज्यामध्ये २०१३ पासून शेतकर्यांच्या धानाला बोनस दिल्या जाते. मागील पाच वर्षांतही भाजपा सरकारने हे बोनस दिले. परंतू जनमताचा अवमान करून सत्तेत आलेल्या या विश्वासघाती मविआ सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शेतकर्याच्या बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी, अशी मागणी करणारे उद्धव ठाकरे आज स्वतः मुख्यंत्री आहेत, परंतू त्यांना आता राज्यातील शेतकऱ्यांचा विसर पडलेला दिसतो. असेच या सरकारच्या निर्णयांवरून वाटते.
लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत धान उत्पादक शेतकर्यांच्या बोनस संदर्भात प्रश्न मांडला परंतु या शेतकरीविरोधी सरकारने शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. एकुणच मविआ सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण आहे. असा घणाघात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला.
याप्रसंगी, महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा उपाध्यक्ष रामपाल सिंह, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, महामंत्री विजय आगरे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, माजी जि. प. सदस्य गौतमजी निमगडे, माजी पं. स. सभापती केमाताई रायपुरे, माजी उपसभापती विकास जुमनाके, सुभाष पिंपळशेंडे, बालू भोंगळे, राकेश गौरकर, ऋषी कोवे, पारस पिंपळकर, अनिताताई भोयर, अजय चार्लेकर, फारूश शेख, गणपत चौधरी, विनोद खडसे, मंगेश राजगडकर, सुशांत शर्मा, आशिष वाढई, भारत रोहणे, संदिप ठाकरे, बंटी भोस्कर आदिंसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...