आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
*मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी)
: चंद्रपुरातील त्या मुलीचा अपघात नसून ,सामूहिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप सर्व स्तरातून होत असताना , त्या मुलीच्या नातेवाईकांनी व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस प्रशासनावर बोट उचलले आहे .
पोलीस प्रशासन व काही व्यक्ती मिळून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असे आरोप होताहेत जर हे खरे असेल तर चंद्रपूर पोलीस प्रशासनासाठी ही अत्यंत शरमेची बाब आहे असे जनमानसात बोलले जात आहे .
चंद्रपूर: शहरालगतच्या चोराळा गावालगत मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. पडोली पोलिसांनी चारचाकी वाहनाच्या धडकेत तरूणीचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र, युवा स्वाभिमानी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे मृतक तरुणीच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन मुलीवर सामूहिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पडोली पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित प्रियकराच्या बयानावर एकतर्फी विश्वास ठेवून तपास केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व दृष्टिकोनातून तपास करण्यात यावा व मृतक तरुणीच्या कुटुंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चोराळा गावाजवळ प्रियकरास भेटण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. तरुणीच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाल्याने हा अपघात नसून सामूहिक अत्याचार करून खून करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी व काही राजकीय पक्षांनी केला होता. मात्र पडोली पोलिसांनी खून नसून अपघात असल्याचे जाहिर करून चालकाला अटक केल्याचे सांगितले. त्यामुळे आज युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे व मृतक तरुणीच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत हा अपघात नसून सामूहिक अत्याचार केल्यानंतर खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पडोली पोलिसांनी अपघाताच्या दृष्टिकोनातून तपास केला असून अत्याचार व खून चा दृष्टिकोनातून तपास केला नसल्यामुळे सर्व दृष्टिकोनातून तपास करावा अशी मागणी लावून धरण्यात आली. पत्रकार परिषदेला मृतक तरुणीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मृतक मुलीच्या प्रियकारचे आजोबा हे उपमहानिरीक्षक आहेत व मुलीची मैत्रीनीचे वडील सुद्धा पोलिसात कार्यरत आहेत, त्यामुळे आपल्या मुलीच्या काळजीपोटी तर त्या संशयित प्रियकराच्या बचावासाठी पोलीस प्रशासण हे प्रकरण कायदेशीर रित्या हाताळत नाही आहे असे निदर्शनात येते .
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...