आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
Reg No. MH-36-0010493
कोरपना (प्रतिनिधी): कोरपना तालुक्यात राजरोसपणे अवैध मटका, जुगार, बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीने कळस गाठला असून, अनेक वेळा पोलिसांतील वरिष्ठांकडे तक्रार करूनही उपाययोजना न केल्यामुळे, अखेर डॉ प्रकाश खनके यांनी याविषयी थेट राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रारीचे सविस्तर निवेदन पाठवून कोरपना तालुक्यात सर्रासपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याविषयी विनंती केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, उपरोल्लेखित सर्व अवैध व्यवसाय कोरपना तालुक्यातील बिनदिक्कत सुरू आहेत. स्वत: खनके यांनी याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष अवैध धंदे बंद करण्याची विनंती केली होती. तसेच कुठलीही भीती न बाळगता खुलेआम मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ वा मूकसंमती तर नाही ना? अशी शंकाही त्यांनी निवेदनातून व्यक्त केलेली आहे.
बेकायदेशीर मटका, जुगार , दारू मुळे आदिवासी बहुल तालुक्यातील सुशिक्षित युवापिढीसह शेतकरी, शेतमजुर व्यसनाधीन झाले असून, शेकडो कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. अनेक तरुणांचे व्यसनाधीनतेपायी बळी गेलेले आहेत. त्यामुळे जनतेकडून हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत असल्याने, मी जातीने याविषयी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. परंतु, पोलिसांकडून हे धंदे बंद करण्याविषयी सहकार्य मिळत नाही.
त्यामुळे याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या मतदारसंघातील सर्व बेकायदेशीर व्यवसाय विनाविलंब बंद करण्याविषयी संबंधितांना आदेशित करावे, अशी विनंती गृहमंत्री यांना करण्यात आलेली आहे. तसेच याविषयी त्वरीत कार्यवाही न झाल्यास पोलीस प्रशासनासह शासनही हे धंदे बंद करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असे गृहीत धरून मला लोकशाहीमार्गाने आमरण उपोषण करावे लागेल.
दरम्यानच्या काळात मला मानसिक, शारिरीक इजा झाल्यास वा प्राणहानी झाल्यास त्यास आपले शासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा डॉ प्रकाश खनेके माझी जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना पार्टीचे यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...