वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
उसगाव जवळील गुप्ता पावर प्लांट येथे दिनांक 14 मार्च रोजी रात्री 10 वाजता जाऊन तीन ते चार भंगार चोरट्यानी लोखंडी साहित्य किंमत 62 हजार चोरून नेले. फिर्यादी संतोष बोबडे रा. घुग्घुस सुरक्षा रक्षक यास चोरी झाल्याचे दिसताच त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. आरोपी नितेश सिडाम (21) रा. अमराई वार्ड, घुग्घुस यास दिनांक 15 मार्च रोजी अटक करून चोरीस गेलेले लोखंडी साहित्य किंमत व एक मालवाहक वाहन एमएच 34 बीएच 2116 जप्त केली असा एकूण 2 लाख 12 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फरार भंगार चोरट्याचा शोध पोलीस घेत आहे.
ही कारवाई ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, गुन्हे पथकाचे मनोज धकाते, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, नितीन मराठे, सचिन वासाडे, ज्ञानेश्वर जाधव व महेश मांढरे यांनी केली.
काही महिन्यापूर्वी कॉपर चोरी भंगार चोरट्यानी केली होती. सुरक्षा रक्षकांच्या संगनमताने भंगार चोरीचा प्रकार सुरु आहे अशी चर्चा अनेक महिन्यापासून गावातील नागरिकांत आहे. गुप्ता कंपनी जवळपास मागील आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे कंपनीवर बँकेचे लोन असून या कडे दुर्लक्ष केल्याजात आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...