खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर :- मूल तालुक्यातील भादुर्णी वाळू घाटातील प्रकार असून अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी तलाठी, तहसीलदार ते उपविभागीय अधिकारी स्तरावर यंत्रणा तयार करण्यात आली़ घाटांवर छापा टाकायचा असेल, तर पोलिसांचीही मदत घेण्याचा आदेश सरकारने दिला मात्र तालुका महसूल स्तरावरून रेती माफियांना मिळणारी "खुलीसूट" बघता "गाव बसा नही लुटेरे आ गये" अशी अवस्था सद्यस्थितीमध्ये मूल तालुक्यातील भादुर्णी येथे महसूल विभाग स्तरावर सुरू असल्याचे नागरिकांना दिसून येत आहे.
रात्रंदिवस वाळूचा उपसा होत असतांना विभागातील काही महसूल कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे उघड आहे. नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात वाळू भरून गुपचूपपणे गावाबाहेर काढून दिली जाते . रेतीचे वाहन गावाबाहेर काढून देण्यासाठी गावातील गाव पुढाऱ्यांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत किती जणांचे हात ओले करावे लागतात , याचे किस्से नेहमीच ऐकायला मिळतात.लिलाव झालेल्या घाटातून रेती उपशाची मर्यादा प्रशासनाने लादली आहे. विशेष म्हणजे रेती काढण्यापासून तर नियोजित स्थळी पोचवण्यापर्यंत तस्करांनी स्वतःचे 'नेटवर्क' उभे केले आहे. या नेटवर्कमुळे हजारो ब्रास रेतीची साठवणूक केल्या जाते . विशेष म्हणजे , साठवणूक करतानाही महसूल प्रशासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही. एकंदरीत रेती तस्करांचे नेटवर्क सध्या तगडे असून , महसूल विभागाची यंत्रणासुद्धा यासमोर फिकी पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
मूल तालुक्यातील तीन घाटाचे लिलाव झाले त्यात भादुर्णी रेती घाट,हळदी गावगण्य व डोगरगांव हे तीनही घाट उमा नदी पत्रातील असून या ठिकाणी परवानाधारक वाळू घाट मालकांना शासनाने नियमाकुल केलेल्या अटी व शर्ती मध्ये राहून उत्खनन करणे बंधनकारक राहील असा करारनामा दिला आहे मात्र नियम व अटी-शर्ती ला तिलांजली देत तालुका महसूल प्रशासनाचे मिळालेले आशीर्वाद व संगनमताने सदर वाळू घाटावरून खोऱ्याने रेती उपसा सुरू असून वाळू वाहतूक सुरू असतांना तालुका महसूल प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची तपासणी वा चौकशी केल्या जात असल्याचे निदर्शनात येत नसल्याचे तालुक्यातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...