Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / अवैध मटका त्वरीत बंद...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

अवैध मटका त्वरीत बंद करण्याची डॉ प्रकाश खनके यांची मागणी..

अवैध मटका त्वरीत बंद करण्याची डॉ प्रकाश खनके यांची मागणी..

कोरपना (प्रतिनिधी): कोरपना तालुक्यात राजरोसपणे  अवैध मटका, जुगार, बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीने कळस गाठला असून, अनेक वेळा पोलिसांतील वरिष्ठांकडे तक्रार करूनही  उपाययोजना न केल्यामुळे, अखेर डॉ प्रकाश खनके  यांनी याविषयी थेट राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे  तक्रारीचे सविस्तर निवेदन पाठवून कोरपना तालुक्यात सर्रासपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याविषयी विनंती केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, उपरोल्लेखित सर्व अवैध व्यवसाय कोरपना तालुक्यातील बिनदिक्कत सुरू आहेत.  स्वत: खनके यांनी याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष अवैध धंदे बंद करण्याची विनंती केली होती. तसेच कुठलीही भीती न बाळगता खुलेआम मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ वा मूकसंमती तर नाही ना? अशी शंकाही त्यांनी निवेदनातून व्यक्त केलेली आहे.

बेकायदेशीर मटका, जुगार , दारू मुळे आदिवासी बहुल तालुक्यातील सुशिक्षित युवापिढीसह शेतकरी, शेतमजुर व्यसनाधीन झाले असून, शेकडो कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. अनेक तरुणांचे व्यसनाधीनतेपायी बळी गेलेले आहेत. त्यामुळे जनतेकडून हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत असल्याने, मी जातीने याविषयी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. परंतु, पोलिसांकडून हे धंदे बंद करण्याविषयी सहकार्य मिळत नाही. त्यामुळे याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या मतदारसंघातील सर्व बेकायदेशीर व्यवसाय विनाविलंब बंद करण्याविषयी संबंधितांना आदेशित करावे, अशी विनंती गृहमंत्री यांना करण्यात आलेली आहे. 

तसेच याविषयी त्वरीत कार्यवाही न झाल्यास पोलीस प्रशासनासह शासनही हे धंदे बंद करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असे गृहीत धरून मला लोकशाहीमार्गाने आमरण उपोषण करावे लागेल. दरम्यानच्या काळात मला मानसिक, शारिरीक इजा झाल्यास वा प्राणहानी झाल्यास त्यास आपले शासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा डॉ प्रकाश खनेके माझी जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना पार्टीचे  यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...