आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा : जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्य (दि.११) राजुरा शहर महीला आघाडीच्या वतीने विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या या मेळाव्यात आभूषणावर आधारित रांगोळी स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती याचबरोबर माता जिजाऊ च्या भूमिकेत एकपात्री अभिनय नगरसेविका उज्वला जयपूरकर हिने सादर केली.
यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा पोंभुर्णा पंचायतीच्या समितीच्या सभापती अल्काताई आत्राम उपस्थित होत्या यावेळी महिलांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून महिलांनी राजकारणात अधिक सहभागी होऊन नेतृत्व करण्यासाठी समोर येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी गडचांदूर न. प. माजी अध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, पंचायत समिती सदस्य तथा महिला तालुका अध्यक्षा सूनंदा डोंगे, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई देशपांडे, माजी नगर सेवक श्रीमती उज्वला जयपूरकर, प्रीती रेकलवार, राधेश्याम अडनिया, राजेंद्र डोहे,जिल्हाउपाध्यक्ष तथा खमोना सरपंच हरिदास झाडे, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, सचिन सिंग बैस व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांचा सत्काराबरोबर ई-श्रमिक कार्ड चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, श्रीमती उज्वला जयपूरकर, प्रिती रेकलवार, रेखाताई देशपांडे, कांता कदम, निसर्ग लॉन चे संचालक प्रदिपजी देशपांडे, गणेश रेकलवार, सचिन बैस, राजू वाटेकर, व इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले .
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...