Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / आर्थिक व्यवहारातून...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

आर्थिक व्यवहारातून अवैध वाळू तस्करीतील वाहनांना वरिष्ठ, कनिष्ठांपासून खुलीसूट.

आर्थिक व्यवहारातून अवैध वाळू तस्करीतील वाहनांना वरिष्ठ, कनिष्ठांपासून खुलीसूट.

तस्करीतील तीन ट्रॅक्टर सोडत 96 हजार रु लाचखोरी केल्याच्या चर्चेला उधाण.

ब्रह्मपुरी :- तीन दिवसा अगोदर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अवैध वाळू तस्करी तील वाहन अर्थपूर्ण व्यवहार व मोठ्या राजकीय प्रभावाने सोडल्याची चर्चा शहरात रंगली असतांनाच काल रात्रो ११ वाजताच्या सुमारास अवैध वाळू तस्करी करित असलेल्या तीन ट्रॅक्टर मालकांकडून सुमारे ९६ हजार रुपये घेऊन सोडल्याची घटना मौशी- तोरगाव फाट्या जवळ घडली असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

मौशी - तोरगाव फाट्याजवळ नागभिड कडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला मंडळ अधिकारी व तलाठी यांनी थांबवून रॉयल्टी मागितली असता रॉयल्टी नसल्यानें त्यांचेकडून तेरा हजार रुपये घेऊन सोडण्यात आले. नंतर थोड्याच वेळात दोन ट्रॅक्टर अवैध वाळू भरून आल्याने त्यांच्या कडून सुद्धा रॉयल्टी मागितली असता त्यांच्या कडेही रॉयल्टी नसल्यानें त्यांचेकडून ८३ हजार रुपये घेण्यात आल्याची घटना खमंग चर्चेत आहे.

तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव झाले व टीप्पर,हायवा धारकांना वाटेल तेवढी वाळू परवानाधारक मालकांकडून दिली जाते मात्र ट्रॅक्टर धारकांना दिवसातून फक्त एक ब्रासची रॉयल्टी पाच हजार रु प्रमाणे मिळत आहे व प्रति ब्रास वाळू ट्रिप अठराशे ते दोन हजार रुपये किमतीने विकत असल्याने ट्रॅक्टर धारक एकाच रॉयल्टी वर लपून अवैध वाळू तस्करी करीत असून प्रसंगी आम्हाला वरिष्ठ ते कनिष्ठ वर्गाला आर्थिक व्यवहार करूनच तस्करी करावी लागत असल्याचे एका ट्रॅक्टर धारकाने आपले मनोगत व्यक्त केले.

लोकप्रतिनिधी व पक्षांतर्गत असलेले नेते अथवा कार्यकर्त्यांनी आपल्या तालुका व शहरातील नागरिकांसाठी असलेल्या समस्या व गंभीर मुद्द्यांबाबत एकजुटीने प्रयत्न केल्यास वा भ्रष्ट व कामचोर अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यास समस्येचे निराकरण नक्कीच होणे आहे मात्र तसे होताना तालुक्यात दिसून येत नाही ही शोकांतिका आहे.

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...