Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / भारतीय जनता पार्टी...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे महिला दीनानिमित्य महिला सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे महिला दीनानिमित्य महिला सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन
*भारतीय जनता पार्टी ब्रम्हपुरी :- भा. ज. पा. जिल्हा महिला आघाडी व भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने व भारतीय जनता युवा मोर्चा च्या सहकार्याने 13 मार्च रोजी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे महिला दिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सायकल स्पर्धाचे यशस्वी आयोजन मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार व कु.अल्काताई आत्राम यांच्या सहकार्याने करण्यात आले. स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित होती गट क्रमांक एक वर्ष 15 ते वर्ष 30 वर्षातील महिलांमध्ये प्रथम क्रमांक तन्वी प्रधान, द्वितीय क्रमांक आरती मुकुंद भानारकर तर तृतीय क्रमांक तृष्णा कोरे यांनी पटकावला.तर गट क्रमांक दोन मध्ये 31 वर्ष व पुढिल महिला सहभागी होत्या या गटामध्ये प्रथम क्रमांक श्रीमती कविता तुषारजी मोहता, द्वितीय क्रमांक श्रीमती सुषमा थोटे,तृतीय क्रमांक श्रीमती रेखा गणवीर यांनी पटकाविला. दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक 5000 रूपये , व्दितीय- 3000 रूपये , तर तृतीय क्रमांक करीता 2000 रूपये होते. दुसऱ्या गटातील प्रथम पुरस्कार विजेते श्रीमती कविता तुषारजी मोहता यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकावरील स्पर्धकांच्या सायकलची चैन पडल्याने त्या मागे राहिल्या गेल्याने आपल्या पारितोषिकाची रक्कम दोन्ही स्पर्धकांना वाटून देत माणुसकीचे दर्शन घडवित मनाचा मोठेपणा दाखवला. 15 ते 30 वयोगटात एकूण 115 स्पर्धकानी तर 30 ते पुढील वयोगटात 73 स्पर्धकानी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी माजी आमदार प्रा.अतुलजी देशकर,रेशमीताई पेशने, कृष्णा सहारे,संजय गजपुरे, प्रा संजय लांबे,दीपालीताई मेश्राम,वंदनाताई शेंडे,हेमलता ताई नंदूरकर,धोटे ताई,अनघाताई दंडवते,सौ.मंजिरीताई राजनकर,सौ.पुष्पा गराडे,सौ.बालपांडे,सौ.नलीनी बगमारे,डॉ.बालपांडे,प्रा.शेंडे,नांमदेवजी लांजेवार, प्रा. सालवाटकर,पंढरीजी खानोरकर मनोजभाऊ भूपाल,मनोजभाऊ वटे, अरविंद नंदूरकर, साकेत भणारकर, प्रा.सुयोग बाळबुधे, स्वप्नील अलगदेवे,प्रमोद बांगरे,पावन जयस्वाल, अमित रोकडे,केतन पेशने,प्रशांत चव्हाण,क्रीष्णा वैद्य, रोशन सावरबांधे व पंच म्हणून ब्रम्हपुरी शारीरिक विभागातील सर्व प्रमुख उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...