Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / नगरसेवकानी साल्वंट...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

नगरसेवकानी साल्वंट कंपनी विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे

नगरसेवकानी साल्वंट कंपनी विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे

आर.बी.एस. कंपनी संचालक निलेश मोहता यांची पत्रकार परिषदेत माहिती

ब्रह्मपुरी:- येथील नगर परिषदेचे नगरसेवक महेश भरे यांनी प्रसारमाध्यमातून रामदेव बाबा साल्वंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरोधात जे आरोप केलेत त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत अशी दिनांक १० मार्च २०२२ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना रामदेव बाबा साल्वंट कंपनीचे संचालक निलेश मोहता यांनी नगरसेवकाच्या त्या आरोपांचे खंडन केले आहे. ब्रह्मपुरी पासून जवळच उदापूर ते बोरगाव रस्त्यावर रामदेवबाबा साल्वंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. पर्यावरण विभागाच्या निर्देशानुसार ही कंपनी योग्य पद्धतीने कार्य करत असून शासनाच्या निर्देशांचे पालन योग्य पद्धतीने कंपनीकडून होत आहे. मात्र काही राजकीय पुढारी स्वहितासाठी साल्वंट कंपनीला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बदनाम करीत आहेत. या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या विनापरवाना अवैद्य बांधकाम करण्यात आलेला नसून वेळोवेळी माहिती घेऊनच बांधकाम करण्यात आलेले आहे. वाढीव बांधकामासाठी दिनांक ९/११/२०२१ ला परवानगी साठी अर्ज नगर परिषदेकडे सादर केलेला आहे. नगर रचनाकार चंद्रपूर व नगर परिषदेच्या नियमाप्रमाणे सदर जागेचा लेआउट मंजूर करण्यात आलेला आहे. शिवाय उदापूर गावात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन कंपनीच्या सीएसआर फंडातून शुद्ध पाण्यासाठी आरो मशीन बसवण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच झिलबोडी गावात पाण्याची टाकी व बोरवेलचे काम हाती घेऊन सी एस आर फंडामधून कंपनी काम करीत आहे. कंपनीकडून आजतागायत कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार घडला नसून तक्रारदार यांनी पूर्वग्रह दुषीत भावनेतून कंपनी विरोधात बदनामी करण्याचे कट कारस्थान रचले आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यातून कंपनीची विनाकारण होणारी बदनामी हा गैर प्रकार असून त्यांच्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तत्थ नाही असे श्री निलेश मोहता रामदेव बाबा साल्वंट कंपनीचे संचालक यांनी सदर नगरसेवकांनी केलेल्या त्या आरोपाचे खंडन पत्रकार परिषदेत केले आहे.

ताज्या बातम्या

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...