Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / वंचित बहुजन आघाडीचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम

वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):

राजुरा, 11 मार्च : मुख्य मार्गावरील गतिरोधक चालकांना दिसत नसल्याने या गतिरोधका जवळ अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. याची दखल घेत काल वंचित बहुजन आघाडी राजुरा तालुक्याच्या वतीने श्रमदान करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष भूषण भाऊ फूसे यांच्या पुढाकाराने जोगापूर गेट जवळील गतिरोधकाना पांढरा रंग मारण्यात आला. स्पष्ट दिसत नसल्याने वाहतुकीस अडचण ठरत असलेले गतिरोधक वाहन चालकांना दिसून त्यांना वाहनांवर आवर घालत वेगावर नियंत्रणास मदत होईल व होणाऱ्या अपघातांना पूर्णविराम लागेल.

या गतिरोधकांमुळे खूप वाटसरू ना अपघाताला सामोरे जावे लागत होते. यामुळे या रस्त्या वरील रहदारी बघता  रात्रीच्या वेळी चालकांना काहीच दिसत नसल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत होता. याची दखल घेत तिथे जाऊन गतिरोधकाला पांढरा रंग मारण्यात आला. तसेच त्यानंतर शिवाजी नगर येथील मुख्य मार्गावरील गतिरोधकाना रंग लावण्यात आले. जेणेकरून अपघात होऊ नये. तसेच चालकांना गतिरोधक दिसल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल व अपघात टळेल.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भूषण फूसे, जिल्हा सचिव तथा राजुरा तालुका निरीक्षक रमेश लिंगमपल्लीवार, प्रसिद्धी प्रमुख अमोल राऊत, जिल्हा सदस्य महेंद्रसिंग ठाकूर, राजुरा तालुका अध्यक्ष सुशील मडावी, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे,  तालुका महासचिव रविकिरण बावणे,  तालुका उपाध्यक्ष सुभाष रामटेके, तालुका कार्याध्यक्ष सुभाष हजारे आदी उपस्थित राहून गतिरोधकांना पांढरा रंग लावण्यास सहकार्य केले.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...