Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / कोलाम बांधवांनी बांधला...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

कोलाम बांधवांनी बांधला श्रमदानातून बंधारा || जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम.

कोलाम बांधवांनी बांधला श्रमदानातून बंधारा || जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम.

 


जिवती (ता.१०) - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन माणिकगड पहाडावरील अती दुर्गम रायपूर व खडकी कोलामगुड्यातील महिला व युवकांनी खोल दरीत वाहणाऱ्या नाल्यात श्रमदानातून बंधारा बांधून नवा आदर्श निर्माण केला आहे. बारमाही वाहणाऱ्या नाल्याचे पाणी अडवून दुष्काळ समस्येवर मात करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने कोलामांनी केलेला आहे.
     जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम बुधवारी (ता.९) रायपूर येथे समाज भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी सांगितले की, माणिकगड पहाडावरील कोलामगुडे सातत्याने उपेक्षेचे केंद्र ठरलेले आहे. आदिम कोलामांसाठी मंजूर झालेल्या घरकुल, शौचालय, विहीर बांधकामात संगनमताने कोलामांना लुटल्याचे समोर आले आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही कोलामांना अद्याप न्याय मिळालेला नाही. कोलामांच्या अज्ञानाचा व भित्रेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना अनेक योजना पासून वंचित ठेवले जात आहे. कोलामांना अकार्यक्षम ठरवून त्यांना त्यांच्या हक्काच्या रोजगार हमी योजनेतील कामांपासून वंचित ठेवले जात आहे. हे पाप खपवून घेतले जाणार नाही. शेतीचे कामे संपल्यानंतर जिवती तालुक्यातील अनेक कोलामगुडे रोजगाराच्या शोधात स्थलांतरित होतात. तेलंगणा, आन्ध्रप्रदेश याठिकाणी कोलाम रोजगारासाठी भटकत असतानाही माणिकगड पहाडावर रोजगार हमी योजनेची कामे कोलामांना दिली जात नाहीत. त्यांना रोजंदारीच्या कामात उत्साह नसल्याचा बनाव करून जिवती तालुक्यातील नोकरशाही इच्छूक कोलामांना जाणिवपूर्वक रोजगारापासून वंचित ठेवत आहे. यावर रायपूर, खडकी येथील कोलामांनी वस्ती लगतच्या नाल्यात श्रमदानाने बंधारा बांधून यंत्रणेच्या डोळ्यावरील पट्टी हटविण्याचा प्रयत्न केलेला आहे. 
    रायपूर लगतच्या खोल दरीत वाहणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधून कोलामांनी आपली रोजगार क्षमता सिद्ध केलेली आहे. सोबतच दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आगाऊ तयारी करून कोलाम समुदायांनी आपल्या कल्पकतेचा परिचय दिला आहे. कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे मार्गदर्शनाखाली ग्राम विकास समिती रायपूर शाखेचे अध्यक्ष नामदेव कोडापे व खडकी शाखेचे अध्यक्ष भिमराव कोडापे यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी एकजुटीने बंधारा बांधला. यावेळी व्यासपिठावर गाव पाटील बाजीराव कोडापे, आंगणवाडी शिक्षिका मनकरणा केंद्रे व मीना पडवेकर, लेतू कोडापे, सुनिता कुंभारे, नामदेव कोडापे आदि मान्यवर उपस्थित होते. संचालन व आभार देवू सिडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बारीकराव कोडापे, भिमा कुमरे, संघर्ष पडवेकर, अयु कुमरे, रामा सिडाम, अयु सिडाम, जैतु सिडाम, झाडु मडावी, उत्तम मडावी, सुंदरी सिडाम, रामबाई कोडापे, राधिका कोडापे, मुत्ताबाई मडावी, सुपाबाई सिडाम, लच्चू कोडापे,लेतू सिडाम, तुकाराम कुमरे व अन्य गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान. 24 November, 2024

संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.

वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन. 23 November, 2024

वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.

...

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...