वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
दिनांक 8 मार्च 2022 रोजी ग्रामपंचायत नकोडा यांचे सौजन्याने "जागतिक महिला दिन " साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त दिवसाची सुरुवात ग्राम स्वच्छता अभियान राबवून करण्यात आली. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, सुगम संगीत इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत नकोडा गावातील अनेक महिलांनी व मुलींनी सहभाग घेतला.
तसेच या दिनाचे औचित्य साधून श्रमिक महिलांना ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड चे वितरण करण्यात आले. तसेच संजय गांधी व श्रावण बाळ निराधार महिलांना लाभ मंजुरीचे प्रमाणपत्र व मतदान कार्ड वाटप करण्यात आले. Covid 19 काळात जीव धोक्यात टाकून आपले कर्तव्य बजावणारी *आशा वर्कर्स * यांचा साडी व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुरुषापेक्षा ही उत्कृष्ट असे मिस्त्री (घर बांधणीचे काम) काम करणारी महिला श्रीमती मंगला लभाने यांचा सुद्धा साडी व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच प्रत्येक घरोघरी जावून केर कचरा गोळा करण्या करिता 5 नवीन घंटा गाडी चे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सौ. सविता ताई ऋषी कोवे (सदस्य, पं. स. चंद्रपूर) व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सौ. तनुश्री किरण बांदूरकर (माजी सरपंच) होते. तसेच प्रमुख उपस्थितीत सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, माजी सरपंच ऋषी कोवे, ग्रामपंचायत सदस्य गण - जसबिर कौर सिंह, हेमा ताला, सुजाता गिदे, ममता मोरे, विठ्ठल तुरनकर, प्रभाकर लिंगमपेलली, व गावातील असंख्य महिला उपस्थित होत्या.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...