Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरी शासकीय रुग्णालयात...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीसाठी गरोदर महिला ताटकळतात उन्हात.

ब्रम्हपुरी शासकीय रुग्णालयात सोनोग्राफीसाठी गरोदर महिला ताटकळतात उन्हात.

नियमित डॉक्टरचं नाही व कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीने रुग्ण हैराण.

ब्रम्हपुरी :- जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील रूग्णांना अनेकदा गंभीर आजाराच्या उपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. रुग्णांची ही अडचण लक्षात घेत त्यांना दिलासा देण्यासाठी ब्रम्हपुरी येथील शासकीय रुग्णालय सर्वसोयी सुविधांनी अद्यावत करण्यासाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयाला, उप जिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता व प्रशस्त इमारत मिळाली मात्र कर्मचाऱ्यांचा नेहमीचा उर्मट पणा व नियमित डॉक्टर उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होतं आहे. मुख्यत्वे गरोदर महिलांकरिता आठवड्यातील फक्त शुक्रवारला सोनोग्राफी सेंटर उघडे असतांना नियमित डॉक्टर नसल्याने व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तणुकीने गरोदर महिलांना तासन तास उन्हात ताटकळत बसावे लागत आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यातील खासगी दवाखान्यांमध्ये हजार ते पंधराशे रुपये सोनोग्राफी फीस असल्याने सर्वसाधारण रुग्णांना हे परवडण्यासारखे नसल्याने ब्रह्मपुरी शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली  या रूग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरोदर महीला रूग्णालयात येतात. मात्र या महिलांना त्यांच्या प्रकृती च्या दृष्टीने विविध सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची व त्या रुग्णालयाची जवाबदारी आहे. मात्र या गरोदर महीलांकरीता बसायला टेबल-खुर्ची ची सुविधा सुद्धा या रूग्णालयात उपलब्ध होत नाही व उन्हामध्ये ताटकळत बसावे लागणे ही फार मोठी शोकांतिका असून गांभीर्याची बाब आहे.

रूग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी ग्रामीण तसेच शहरांतील महीला शुक्रवारला रूग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आले असता कर्तव्यावर असलेले डॉक्टर कधी येणारं असे गरोदर महिलांकडून तेथील कार्यरत कर्मचाऱ्यांना विचारणा केले असता डॉक्टर नाष्टा करायला गेल्यात ,बाहेर थांबा, आले तेव्हा पाहू, समजत नाही का वारंवार विचारता, नंतर या लाईन मध्ये उभे रहा, कट कट नको, दिमाख करू नका असे उर्मट वर्तवणूक कर्मचारी करीत होते व डॉक्टर दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास हजर होतं असतात. संबंधित गरोदर महिलांना प्रतिनिधीने विचारणा केली असता इथे असे नेहमीच होतंय व आमच्या परिस्थितीनुसार आम्हाला नाईलाजास्तव इथं सोनोग्राफी करावे लागते असे भावनिक होत सांगितले.

याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खंडाळे यांना माहिती देण्यात आली व होणाऱ्या असुविधे बाबत विचारणा केले असता,आमच्याकडे नियमित सोनोग्राफी करणारे डॉक्टर नाहीत.आम्ही खासगी डॉक्टर बोलावतो त्यांच्याकडे पेशंट असल्याने ते वेळेवर येत नाही आम्ही व्यवस्था केली होती की,मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मिळावेत पण डॉक्टर उपलब्ध होतं नाहीत.

रेडिओलाजिस्ट मिळावे अशी शासनास विनंती केली आहे.पण खाजगी लोकांच्या पॅनलवर काम चालवा काम बंद होऊ देऊ नका असे निर्देश आहेत. खाजगी डॉक्टर येतात तोपर्यंत रुग्ण संख्या३०-४० पर्यन्त जाते मग ते म्हणतात की आम्ही २० -२५ पेशंट करू असचं चालत. बसायची व्यवस्था करू पाहिजे तर ठिकाणही बदलवू सावलीची व्यवस्था करू,नविन बिल्डिंग मध्ये सोनोग्राफी ची व्यवस्था लवकरच होईल.

अतिशय संवेदनशील विषय असतांना ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी कडून निष्काळजीपणाचे कळस गाठले जात असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष घालावे   तर पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्व ब्रह्मपुरी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...