वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस: शनिवार 5 मार्च रोजी घुग्घुस येथील बहिरमबाबा मंदिर देवस्थानात वेकोलितर्फे सुरु करण्यात आलेल्या कामाची पाहणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, घुग्घुस वेकोली वणी क्षेत्राचे उप क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे, कॉम्प्लेक्स क्षेत्राचे प्रबंधक अनंत ठाकरे, बहिरम बाबा मंदिर देवस्थान कमेटीचे अध्यक्ष शाम आगदारी, भाजपाचे विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, रोहन पोगला, अमोल तुळसे यांनी केली. याप्रसंगी बोलतांना माजी उपसरपंच संजय तिवारी म्हणाले घुग्घुस शहरातील सर्व विकासाची कामे भाजपाच्या माध्यमातून केली आहे भाजपाने केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस ने करू नये घुग्घुसच्या विकासात काँग्रेसचे कोणते योगदान आहे ते दाखवावे भाजपाच्या माध्यमातून घुग्घुस शहरात रस्ते, पिण्याच्या पाण्याची टाकी, आरो मशीन, नाली, बगीचे, धार्मिक स्थळांचा विकास, सभागृह, सर्व समाजाच्या स्मशान भूमीचा विकास , हायमास्ट लाईट, ग्रामीण रुग्णालयाचे काम, नवीन बसस्थानकाचे बांधकाम, एलईडी लाईट, वाढीव पोल त्यावर लाईट, शाळा, अंगणवाडी इमारतीचे काम, घुग्घुस शहरातील बायपास रस्ते, पशु वैद्यकीय रुग्णालयाची प्रशस्त इमारत, वर्धा नदीवरील पूल सह अशी विविध विकासाची कामे फक्त आणि फक्त भाजपाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या समर्थकांनी काँग्रेसच्या मागणीला यश आले व काँग्रेसच्या निवेदनामुळे देवस्थानात काम सुरु झाले अशी पोस्ट समाज माध्यमात टाकून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता याला माजी उप सरपंच संजय तिवारी यांनी जोरदार उत्तर दिले काँग्रेसच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे निवेदन देऊनही काम सुरु झाले नाही भाजपाने आंदोलन केले म्हणून या देवस्थानात वेकोलीने काम सुरु केले.
गुरुवार 3 मार्च रोजी सकाळी 9 वाजता येथील कॉ. नं. 2 जवळील बहिरमबाबा देवस्थान समोर घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्त्वात रस्ता रोको व भजन आंदोलन करण्यात आले.
सकाळी 9 वाजता पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ता रोको आंदोलन सुरु असल्याने तब्बल 3 तास कोळश्याची वाहतूक ठप्प झाल्याने कोळशाच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मागील काही महिन्यापासून येथील बहिरमबाबा देवस्थानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, समोरील रस्त्यावर कोळश्याची धूळ साचून राहते व रस्त्यावर पाणी मारल्या जात नाही, मागील बाजूस मोठा खड्डा पडलेला आहे, मंदिराकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे तसेच स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. मंदिर परिसरातील लावलेली झाडे खराब झाल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपा नेत्यांनी व कॉ. नं. 2 येथील वार्ड वासियांनी आपल्या मुलाबाळा सह रस्त्यावर ठिय्या मांडून रस्ता रोको व भजन आंदोलन केले.
वेकोली व्यवस्थापनाचे ओमप्रकाश फुलारे, संजय विर्मलवार, पिसारोड्डी यांनी
बहिरम बाबा मंदिर देवस्थान येथे दिनांक 20 मार्च पर्यंत पाण्याची व पिण्याच्या पाण्याची 24 तास मुबलक व्यवस्था केली जाईल, मंदिरा मागील खड्डा बुझविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, मंदिरा समोरील रस्त्यावर धूळ साफ करणे व पाणी मारणे सुरु करण्यात आले आहे, मंदिर परिसरात झाडे लावणे व पाणी मारणे सुरु केले जाईल, घुग्घुस ते बहिरमबाबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोझर मारून रस्ता दुरुस्त करून पथदिवे लावण्यात येईल तसेच स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर डोझर मारून रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...