Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जिवती तालुक्यातील एकही...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जिवती तालुक्यातील एकही ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नाही सुदाम राठोड यांची BDO ला तक्रार

जिवती तालुक्यातील एकही ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहत नाही सुदाम राठोड यांची BDO ला तक्रार

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधि):
          जय विदर्भ पार्टी मार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यात येत असून त्याबाबत त्यांना न्याय मिळवून देत आहे, सद्यस्थितीत आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की आपल्या अखत्यारीतील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे वेळेवर त्यांचे ड्युटीवर हजर राहत नाहीत, तसेच अनेक ग्रामसेवक हे वेळेवर येत नाहीत,आलेच तर फक्त एक ते दोन तास ग्रामपंचायत कार्यालयमध्ये थांबून निघून जातात तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये तर संबंधीत ग्रामसेवक हे  दोन ते तीन दिवसाआड येत असतात,त्याबाबत त्यांना विचारपूस केली असता सांबांधिताकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळतात आम्हास कामानिमित्त तालुका/जिल्हा ठिकाणी जायचे आहे आम्हकडे दुसऱ्या गावाचा चार्जेस असून त्याठिकाणी जायचे आहे अशी कारणे देऊन जनतेला वेठीस धरत असतात.
तसेच दि. 31 ऑगस्ट 1988 च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाची वेळ ही सकाळी 09:45 ते साय.06:15 पर्यंत असते परंतु अनेक वेळा संबंधित शासकीय कर्मचारी हे वेळेच्या आत परस्पर निघून जात असतात ,संभधितांच्या अशा वागण्यामुळे जनतेला याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे व त्यांची वेळ सुद्धा वाया जाऊन त्यांना त्यांची कामे वेळेच्या आत करता येत नाहीत.
जय विदर्भ पार्टी तर्फे जिवती तालुक्यातील बी.डी.ओ. साहेबाना विनंती करण्यात आली की तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर ग्रामसेवक त्या ग्रामपंचयातला हजर राहण्याचे दिवस व येण्याजाण्याची वेळेसंबंधी बोर्ड लावणे बंधनकारक करावे.
व तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व इतर कर्मचारी वर्गाच्या हजेरीसाठी मॅन्युअल रजिस्टर सोबत बायोमॅटिक हजेरी लावण्यात यावी जेणेकरून ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत कार्यालयात वेळेवर हजर राहतील व पूर्ण वेळ काम करतील, आणि
शासनाने सामान्य नागरिकाला ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन पाहण्यासाठी E swaraj हे पोर्टल व App उपलब्ध करुन दिलेले आहे, परंतु ग्रामसेवक त्या पोर्टलवर 6 ते 8 महिने आर्थिक व्यवहार अपडेट करत नाही ,कारण त्यांना सामान्य लोकांना ग्रामपंचायतीमध्ये काय कार्य सुरू आहे हे लपवायचे असते,आमची विनंती आहे की ,ग्रामपंचायतीमध्ये सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी महिना संपल्यावर पुढील 30 दिवसाचे वेळेचे बंधन ठरविण्यासाठी यांचे जेणेकरून सामान्य लोकांना ग्रामपंचायतीच्या योजना व व्यवहारासाठी रेगुलर प्रोसेस माहिती होत राहील.
    अशा प्रकारची माहिती जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी बी.डी.ओ. साहेबांना निवेदनाद्वारे दिली आहे यावेळी विशाल राठोड, विनोद पवार,रामेश्वर पोले,रियाज सय्यद, सचिन पवार आदींची उपस्थिती होती. निवेदनाबाबत गांभीर्याने विचार करावा व आमची मागणी मंजूर करून लोकांना हक्काचा न्याय मिळवून द्याल अशी मागणी बी.डी.ओ. कडे सुदामभाऊ राठोड यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...