वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन महिन्यापासून मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नाही ही समस्या लक्षात घेत घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे यांनी शिष्टमंडळासह प्रा. आ. केंद्रात जाऊन वैद्यकीय अधिकऱ्यांची भेट घेतली व या संदर्भात चर्चा केली तसेच निवेदन देऊन प्रा.आ.केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या पन्नास हजारांच्या जवळपास आहे तसेच घुग्घुस येथील प्रा.आ. केंद्रास परिसरातील पंधरा गावे जोडलेली आहे त्यामुळे दररोज मोठया संख्येत गोर गरीब मधुमेहाचे रुग्ण प्रा. आ. केंद्रात तपासणी करिता येतात परंतु या केंद्रात मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने येणाऱ्या गोर गरीब रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे मधुमेहाच्या रुग्णांना दररोज मधुमेहाच्या गोळ्यांचे सेवन करावे लागते त्यामुळे घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ मधुमेहाच्या गोळ्या उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, सुचिता लुटे, वैशाली ढवस, लक्ष्मी नलभोगा, पुष्पा रामटेके, वंदना मुळेवार, विना घोरपडे, वंदना गणफाडे, अर्चना लेंडे, नंदा चिमुरकर, अनिता परचाके, कांचन डांगे, सुनीता पाटील, सुनीता घिवे, दुर्गा जुमनाके, प्रतिमा बहादे, अंकिता बहादे, सुनंदा लिहीतकर व लता आवारी उपस्थित होत्या.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...