Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / राजुराच्या विधार्थ्याचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

राजुराच्या विधार्थ्याचा युक्रेन वरून सुखरूप प्रवास!

राजुराच्या विधार्थ्याचा युक्रेन वरून सुखरूप प्रवास!

 

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी):

भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने "ऑपरेशन गंगा" नावाने राबवलेल्या मोहिमेतून युद्धात होरपडलेल्या युक्रेन मधून हजारो विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशी सुखरूप आणण्याचे काम सुरू आहे. अश्यातच राजुरा येथील विद्यार्थिनी कु. अनिशा करीम शेख रा. जवाहरनगर वार्ड ही मुलगी वैद्यकीय शिक्षणा करिता युक्रेन मध्ये होती. ती नुकतीच युद्ध सुरू होण्याच्या अगोदर घरी परतली परंतु ती तिच्या सोबत असलेल्या विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात असल्यामुळे तिने तिथली अपबीती सांगितली. भारतीय जनता पार्टी केंद्रीय नेततृत्वाने त्या त्या भागातील कार्यकर्त्यांना युक्रेन मध्ये अडकलेल्या व सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटून माहिती घेण्याकरिता केलेल्या अवाहणानुसार, विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार, भाजप चे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दखल घेऊन आज दि.03.03.2022 ला भाजप चे चंद्रपूर जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांना राजुरा येथे पाठवले त्यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर, सतीश धोटे, राजेंद्र डोहे, दिलिप वांढरे, प्रशांत घरोटे, सचिन शेंडे, शहजाद अली, सचिन बैस, जनार्धन निकोडे इत्यादींनी कु. अनिशा शेख सह आई वडिलांची भेट घेतली असता तिने पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी माझ्या सारख्या युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आनन्या करिता तातडीने धाडसी निर्णय घेतल्यामुळेच हजारो विद्यार्थ्यांचे जीव वाचल्याची भावना व्यक्त केली. व घरी येऊन आस्थेने विचारपूस केल्याबध्दल उपस्थितांचे आभार मानले.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...