वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस : गोमांस विक्रीवर बंदी असतांनाही घुग्घुस शहरात सर्रास पणे गोमांस विक्री सुरु आहे यासाठी रविवार, बुधवार व शुक्रवार हे ठराविक दिवस ठरविलेले आहे. घुग्घुस शहरातील तलावाच्या जवळ, शिवनगर, कॉ. नं. 2 या ठिकाणी बेकायदेशीर पणे गोवंशाची कत्ल केली जाते व त्याचे मास उघड्यावर वजन काटा करून ग्राहकांना किलो प्रमाणे विकले जाते स्वस्त दारात हे मांस विकले जात असल्याने लोकांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी सकाळी गोळा होते.
गोवंशाची तस्करी करून तसेच चोरी केलेले गोवंशाची जनावरे घुग्घुस येथील कसाई विकत घेतात व ते कटाई करून त्या गोवंशाचे मांस उघड्यावर विक्री करतात आजारी असलेले गोवंशाची जनावरे ही मांस विक्री साठी कापले जातात तसेच कटाई साठी गोवंशाची जनावरे न मिळाल्यास वेळे प्रसंगी म्हशी ही कापल्या जातात व म्हशीचे मांस विकले जाते.
आजारी असलेले जनावरे कत्ल करून विक्री केल्या जात असल्याने येथील सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. घुग्घुस शहरातील गोमांस विक्रेते घरपोच सेवा देऊन घरोघरी गोमांस नेऊन देत आहे सध्या शहरात एका राजकीय सत्ताधारी पक्षाच्या शहर अध्यक्षाचा खंदे समर्थक असलेला एक नेते सत्तेचा गैरवापर करून सर्रास पणे घुग्घुस शहरात अवैध गोमांस विक्री राजकीय वरदहस्तातुन करित आहे. मागील अनेक महिन्यापासून हा अवैध गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरु आहे त्यामुळे नागरिकांनी गोमांस विक्री तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...