Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / वेकोलीच्या अधिकाऱ्याकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

वेकोलीच्या अधिकाऱ्याकडून गावकऱ्यांची दिशाभुल ।। विरूर वासीयांना पुनर्वसन किंवा प्लाँटची योग्य किमंत मिळावी म्हणून मागणी

वेकोलीच्या अधिकाऱ्याकडून गावकऱ्यांची दिशाभुल ।। विरूर वासीयांना पुनर्वसन किंवा प्लाँटची योग्य किमंत मिळावी म्हणून मागणी

 मंगेश तिखट (प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील पैनगंगा वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी विरूर - गाडेगाव वासीयांची खरोखरच दिशाभूल केली आहे, येथील अधिकाऱ्यांमुळे विरूर गाववासीय आर्थिक संकटात सापडल्यांची ओरड असून, या प्रकल्पाच्या आडमुठ्या, अरेरावी, हेकेखोर धोरणाला कंटाळून इच्छेनुसार गावकऱ्यांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदन सादर करून पैनगंगा वेकोली प्रकल्प विरोधात तक्रार केली आहे. 

सविस्तर वृत्त याप्रमाने आहे की पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर - गाडेगाव 2017-18 पासून उदयास आली. गावातील जमिनी संपादित केल्या, गावातील एकूण 260 घरांपैकी बहुतेक लोकांना योग्य मोबदला देण्यात आला. परंतु  येथील गावकऱ्यांना विस्तृत विश्वासात न घेता गावात डोजर लावून घर पाडून बेघर केले. आणि काही ग्रामपंचायतीच्या संबंधित असलेल्या सरपंच यांना व 19 लोकांना खैरगाव नाल्याच्या जवळपास जागा देवून पोबारा केला आहे, परंतु गावातील 53 लोकांच्या जमिनी हस्तगत करून त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही.

त्यात शेत रिविदास कोंडू करमणकर सह  ग्रामस्थ आहेत, या अणुषंगाने  गावकऱ्यांनी या पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांच्या विरोधात, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार सुभाष धोटे आणि जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडेही  वेकोलीच्या विरोधात तक्रार गावकऱ्यांनी केली होती. त्यावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात बैठकीचे चे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा पालकमंत्री वडेट्टीवार, जिल्हाधीकारी, पैनगंगा वेकोलिचे अधिकारी उपस्थित होते तेव्हा पालकमंत्री यांनी आधी गावकऱ्यांचा प्रश्न सोडवा नंतर खाणीचे काम सुरू करा असे निर्देश दिले होते. त्यानंतर ही बैठकीत हेच निर्देश देण्यात आले परंतु वेकोली च्या अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केली नाही.

पोलीस अधीक्षक, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, कोरपना तहसीलदार यांना निवेदन देऊन तक्रार गडचांदूर पोलीस ठाण्यात दिली आहे, पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांच्यावर तक्रार, गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालायत जाण्याची तक्रारदाराची तयारी असल्याचे कळविले आहे,  दरम्यान रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत, पैनगंगा कार्यालयाच्या जवळ विरूर वासिय तक्रारदार या ठिकाणी जाऊन उपोषणाला बसण्याची इच्छा पूर्णपने असल्याचे आज आयोजित पत्रकार परिषदेत पिडीत ग्रामस्थ रविदास  करमणकर, कितीदास करमणकर, सुधाकर केळझरकर, विक्रम ताजने, जितेंद्र करमणकर, विठ्ठल बोबडे, प्रदिप करमणकर आणी गौतम धोटे , मारोती पिंपळकर यांनी कळविले.

पैनगंगा वेकोलीच्या संदर्भात चक्क जिल्हाधिकारी यांना निवेदन देत, पैनगंगा वेकोलीच्या विरुद्धात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार विरूर - गाडेगाव ग्रामस्थानी केली आहे. गावकऱ्यांना मोबदलल्यात जागा द्यावी नाहीतर  खाली जाग्याचे तिन लाख रूपये देण्यात यावे आणि झेंडा तोडफोड केला तो पुनर्वसन जागी देण्यात यावा अन्यथा पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांनी गावातील पात्रातून अवैध कोळसा उत्खनन थांबवावे अश्या रास्त मागण्या विरूर गावातील 53 गावकऱ्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...