Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / सावकारी च्या नावाखाली...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

सावकारी च्या नावाखाली गोरगरिबांच्या जमिनी बळकावनाऱ्यांवर कार्यवाही करा - श्री. सुरज ठाकरे

सावकारी च्या नावाखाली गोरगरिबांच्या जमिनी बळकावनाऱ्यांवर कार्यवाही करा - श्री. सुरज ठाकरे

मंगेश तिखट (प्रतिनिधी कोरपना तालुका):

:- चंद्रपुर शहरातील सरकार नगर येथील रहिवासी श्री. ऋषीराज राधेश्याम सोमानी व यांची आई यांच्याकडे सावकारीचा कुठलाही प्रकारचा परवाना नसताना देखील  गेल्या अनेक वर्षापासून सावकारीच्या नावाखाली गोरगरीब लोकांच्या जमिनी गिरवी ठेवून व्याजाने पैसे द्यायचे काम करीत आहे. सदर व्यक्ती कुणाला ८० हजार ,कुणाला एक लाख  रुपये, अशी रक्कम देऊन त्यांची लाखो रुपयांची शेती स्वतःच्या नावे करून घेतो तथा मोठ्या शिताफीने गरजू लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत वर्षानुवर्षे त्यांच्यापासून शेकडा दहा ते वीस टक्के प्रमाणे व्याज घेतो व ज्यावेळी पीडित व्यक्ती संपूर्ण पैशांची जुळवाजुळव करून त्याला पैसे वापस घेवून जमीन परत द्या अशी मागणी करतो त्यावेळी हा सावकार  त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज लावून लोकांच्या जमिनी पचवितो, आधीच त्याने जमिनीचे विक्रीपत्र करून ठेवले असल्याने कालांतराने जमीन आपल्या नावे करून घेण्यासाठी फेरफार करिता महसूल विभागाला अर्ज करतो व महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची आर्थिक साटेलोटे करून कास्तकार हरकत असताना देखील त्यांच्या हरकती ला बगल देत महसूल विभागातील अधिकारी या सावकारांच्या नावे सदर जमीन करून देतात. अशा प्रकारचे  काम सदर व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. पिडीत कास्तकारांनी या आधी देखील या संदर्भात पोलिस स्टेशन राजुरा येथे तक्रार केली. परंतु पोलीस विभागाने गैर अर्जदाराची पार्श्वभूमी न समजून घेता सदर प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे. असे सांगून सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने पीडितांनी अखेर युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्याकडे धाव घेत त्यांना समस्या सांगताच श्री. सुरज ठाकरे यांनी दिनांक:- २१/०२/२०२२  रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना सदर प्रकरणा संदर्भात परत फेर विचार करण्याकरिता निवेदन देऊन तात्काळ  सराईत भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
व पीडितांना न्याय न मिळाल्यास पीडितांनी उपोषणाची व वेळप्रसंगी आत्महत्या करण्याची देखील तयारी दर्शविली आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...