Home / चंद्रपूर - जिल्हा / ‘माझे मत माझे भविष्य-एका...

चंद्रपूर - जिल्हा

‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा

15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी: भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. या मतदार जागृती स्पर्धेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, व्हिडिओ मेंकीग स्पर्धा, भित्तीचित्र पोस्टर डिझाईन स्पर्धा, गीत-गायन स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा या पाच प्रकारच्या स्पर्धांचा  समावेश असून  दि. 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहेत.

‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करून निवडणूक आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकट करण्यासाठी करण्यात येत आहे. ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा असून प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणूकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे, नियम व अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेच्या https://ecisveep.nic.in/contest/, www.voterawarenesscontest.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. स्पर्धांचे संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी या तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, सोशल मिडीयावर विशेष ओळख तसेच भारत निवडणूक आयोगाचे नाव असणाऱ्या वस्तू, ई-प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धकांनी आपला प्रवेश अर्ज voter-contest@eci.gov.in वर पाठवावेत. 

तरी, जास्तीत जास्त जनतेने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करण्यास मदत करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...