वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी): शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेच्या वतीने पाठ्यपुस्तकातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रत्यक्ष कवींचे महाराष्ट्रातील पहिले आभासी राज्यस्तरीय ऐतिहासिक कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून दि २१फेब्रुवारी २०२२ रोजी सोमवारी सायंकाळी सात वाजता https://youtube.com/c/ZpLiveEducation या युट्युब लिंकवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आयोजक कवी एम.एम.खुटे यांनी दिली आहे.
कविसंमेलनाचे उद्घाटन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर झोड असणार आहे. प्रमुख अतिथि म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे, शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे, दैनिक सकाळ मराठवाडा आवृत्तीचे संपादक दयानंद माने उपस्थित राहणार आहेत.तांत्रिक सहकार्य तंत्रस्नेही शिक्षक गजेंद्र बोंबले, नितीन अंतरकर यांचे असून सुत्रसंचलन संदिप ढाकणे करणार आहे. पाठ्यपुस्तकातील खालील मान्यवर कवी कवयित्री प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्या पाठ्यपुस्तकातील कविता सादर करणार आहेत.
एकनाथ आव्हाड (चांदोबाच्या देशात इ.२री) तुकाराम धांडे (रानवेडी इ.३री) डॉ.अशोक कोळी (धुळपेरणी इ.४थी) उत्तम कोळगावकर (या काळाच्या भाळावरती इ.६वी) शंकर कसबे (माझ्या आज्यानं पंज्यानं इ.६वी) मृणालिनी कानिटकर-जोशी (माझी मराठी इ.७वी) सुनंदा भावसार (थेंब आज हा पाण्याचा इ.७वी) हनुमंत चांदगुडे (आळाशी इ.८वी) डॉ.कैलास दौंड (गोधडी इ.८वी) तुकाराम धांडे (वनवासी इ.९वी) डॉ.विरा राठोड (मनक्या पेरेन लागा (इ.१०वी) आदी कवी कवयित्री उपस्थित राहणार आहेत. पाठ्यपुस्तकातील कविता प्रत्यक्ष खुद्द स्वत कवीच सादर करणार असून विद्यार्थी, शिक्षक,पालक व साहित्य प्रेमींसाठी हा क्षण अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
सदर कविसंमेलनास उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन अरूण गोर्डे, भास्कर गोपाळ, आत्माराम गोर्डे, गोविंद गायकवाड, योगेश गायकवाड, गोरक्ष जगताप,ए.बी.पठाण, दिपक नवथर, अशोक आढाव, नारायण बहिर, गणेश पूरी, विशाल तिखे, अण्णासाहेब इंगळे,पी.ए.गाढवे आदिनी केले आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...