Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / लालच...मोबाईल टॉवर उभारून...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

लालच...मोबाईल टॉवर उभारून नागरिकांच्या घटनादत्त अधिकारचे हणन

लालच...मोबाईल टॉवर उभारून नागरिकांच्या घटनादत्त अधिकारचे हणन

वारंवार तक्रार,निवेदन मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष

ब्रम्हपुरी :- विद्यानगर ब्रम्ह्पुरी येथील कावळे लेआउट येथे २०१८ मध्ये जिओ मोबाईल टॉवर विषयी नगर परिषद मुख्यधिकारी यांनी टॉवर बांधकामास कुठलीही परवानगी दिली नसतांना नामदेव कावळे याच्या मालकीच्या प्लॉट मध्ये टॉवरचे बांधकाम पूर्णतःवास आले.मोबाइल टॉवर बसविण्यापूर्वी त्यापासून होणारा किरणोत्सर्ग व त्याचे दुष्परिणाम याबद्दल योग्य माहिती आजूबाजूच्या रहिवाशांना दिली नाही व जनतेला अंधारात ठेवून जगण्याच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत. विद्यानगर ब्रम्ह्पुरी येथिल कावळे ले आऊट मधील प्लॉट धारकांनी टॉवर ला विरोध करून प्रशासनास अनेक तक्रार,निवेदने सादर केली परंतु त्यांच्या निवेदनास कुठलेही उत्तर प्रशासना मार्फत मिळाले नाही. जिल्हाधिकारी साहेबांनी २०१८ मध्ये कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या आदेशाची दखल उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत झालेले दिसून आली नाही व टॉवर बांधकामाचा प्रश्न अनुत्तरित राहिला. २०१९ मधे टॉवर बांधकाम सुरु झाले मात्र २०१९ ते २०२१ या काळात कुठंलेही टॉवर बांधकाम सुरु नसल्याने त्यावेळेस रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला. त्यांना असे वाटले की, प्रशासनाने आपल्या निवेदनाची दखल घेतली असावी. परंतु २०२१ ला अचानक पणे टॉवरच्या कामास सुरुवात झाले तेव्हा रहिवाशांनी पुन्हा मुख्यधिकारी, तहसीलदार, आणि उप विभागीय अधिकारी यांना निवेदनामार्फत माहिती देण्यात आली. परंतु प्रशासन स्तब्ध आहे. आजतागायत विद्यानगर येथिल रहिवाशी लढा देत आहेत परंतु प्रशासन जनतेचे प्रश्न सोडविन्यात असमर्थ राहिले. दिनांक १५/२/२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेबांना पुन्हा निवेदनामार्फत २०१८ पासूनच्या कार्यवाहीचा आढावा देऊन टॉवर बांधकामास दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी अशी विनंती करीत नागरिकांच्या शरीरातील पेशींची वाढ विकृत करणारा सजीवांच्या DNA च्या रासायनिक संरचनेला हानी पोहोचविणारा, मेंदूच्या रक्तप्रवाहात अडथळे आणून स्मरणशक्ती कमी करून विविध विकार निर्माण करणारा, हृदयाची गती वाढविणारा, प्रजननसंस्था व संपूर्ण केंद्रीय मज्जासंस्थेवर अनिष्ट परिणाम घडवून आणणारा व विविध प्रकारच्या कर्करोगाला आमंत्रण देणारा अत्यंत हानीकारक असा मोबाइल टॉवरमुळे होणारा किरणोत्सार टाळण्यासाठी या भागात असा टॉवर होऊ द्यायचा नाही अन्यथा टॉवर न हटविल्यास विद्यानगर येथिल नागरिक प्रशासना विरुद्ध जण आन्दोलनाची भूमिका घेणार असे विद्यानगरवासियांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन द्वारे म्हटले आहे

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...