संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती : देशात सलग दोन वर्षांपासून महाभयानक कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे, त्याची झळ जिवती तालुक्यातील खेड्यापाड्यात जाऊन पोहचली आहे. अद्याप कोरोना संपलेला नाही, प्रत्येकाच्या मनात आज ही कोरोनाची भीती व आज ही प्रत्येकाला कोरोना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असतानाच जिवती तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहाय्यक, तलाठी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत तरी कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.
शासनाने कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने दिले आहेत, मात्र मुख्यालयी राहण्याच्या शासकीय आदेशाला कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवून अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामे खोळंबली असल्याचे दिसून येत आहे.
गावाच्या विकासासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते, शासन व गाव यांच्यातील मुख्य दुवा ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, शिक्षक, तलाठी, डॉक्टर आदी कर्मचारी असतात. त्यामुळे सदर कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे, शासकीय कर्मचारी जर ग्रामीण भागात मुख्यालयी राहून सेवा दिल्यास गावाचा विकास झपाट्याने होते.
शासकीय सेवेमध्ये रुजू होताना मुख्यालयात राहण्यासाठी अट असते त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात, तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्ता सुद्धा दिला जातो परंतु या आदेशाला न जुमानता गरजे नुसार राहणे व मुख्यालयी राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जी प्रमाणे शासकीय कर्मचारी वागत असल्याचे चित्र सध्या जिवती तालुक्यात पाहायला मिळत आहे.
अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आपल्या विविध कामाकरिता मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश कर्मचारी गावात ओळखीच्या घरी तसेच आपले निकटचे संबंध असलेल्या घरी राहतो म्हणून रहिवाशी दाखला घेऊन घरभाडे उचलत आहेत. सदर कर्मचारी स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव करीत आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये- जा करीत असल्याने ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे, याला शासकीय प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत.
बरचसे कर्मचारी कामाचा बहाना सांगून दांड्या मारीत असल्याचेही दिसून येत आहे, जिवती तालुका नक्षलग्रस्त भाग व तसेच सोयीसुविधेचा अभाव असल्याचे कारण सांगून अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देण्यास कुचराई करीत आहेत, या समस्याची प्रशासनाने दखल घेऊन गुप्त दौरे व कार्यक्रम राबवून मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिका कडून होत आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...