आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय-वार्ता,प्रतिनिधी चंद्रपूर:-
चंद्रपूर नगरी आणि जिल्यामध्ये मराठा सेवा संघाचे समाजकार्य सन 1995 पासून सुरू झाले. सेवा संघाचे संस्थापक युगनायक शिवश्री पुरूषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी सर्वजातीय शेतकरी समाजाच्या उत्थानासाठी पंचसत्ता सांगीतल्या. शिक्षणसत्ता, अर्थसत्ता, मिडियासत्ता, राजसत्ता आणि धर्मसत्ता. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांनी विविध तेहत्तीस कक्षांची योजना केली आणि सर्वच समाजघटकांना पंचदान देण्याविषयी आवाहन केले. त्यानुसार आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात मराठा सेवा संघाची घोडदौड सुरू आहे.
समाजउत्थानासाठी झटणा-या व्यक्तीला मराठा सेवा संघ चंद्रपूरच्या वतीने दरवर्षी सन्मानीत करण्यात यावे आणि त्याकरिता एक पुरस्कार देण्यात यावा अशी चर्चा मराठा सेवा संघाच्या नियमित बैठकीत सुरू होती. यावर्षीच्या म्हणजे 2022 च्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शुभपर्वावर हा पुरस्कार गणमान्य व्यक्तीला प्रदान करण्यात यावा असा बैठकीत सुर निघाला. एकमुखाने व एकमताने यावर्षीचा पहिला चंद्रपूर गौरव* पुरस्कार डाॕ. ईश्वर कुरेकार साहेब यांना देण्यात यावा असे ठरविण्यात आले.
कुरेकार साहेबांचे नाव पुढे आल्यानंतर ते खरेखुरे चंद्रपूर गौरव आहेत हे मनापासून जाणवले. त्यांचे सामाजिक जीवन आमच्या समुहमनात साकार झाले. विविध छावण्यांमध्ये, गटातटात, भरकटलेल्या या मातीचा मूळ मालक असलेल्या कुणबी जातीला स्वतःचं स्वत्व आणि सत्व सापडलं पाहिजे. या शेतकरी समाजाला आत्मभान आणि आत्मगौरव प्राप्त झाला पाहिजे अशी आंतरिक भावना कुरेकार साहेबांची आहे. आज कुरेकार साहेब सत्तर वर्षांचे आहेत. चंद्रपूरात ते त्यांच्या वयाच्या पंचवीशीपासून राहत आहेत. वायगाव ता. भद्रावती जि. चंद्रपूर येथील संपन्न शेतकरी कुटुंबात कुरेकार साहेबांचा जन्म झाला.त्यांची आई सारूबाई तर वडील दादाजी पाटील कुरेकार. त्यांनी वैद्यकीय व्यवसायाचे उच्च शिक्षण अमरावती येथे पूर्ण केले आणि 1974 साली त्यांनी चंद्रपूर येथे वैद्यकीय व्यवसायाला प्रारंभ केला. त्यांच्या मनात असलेली समाजकार्याविषयीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. समविचारी सहका-यांसोबत त्यांनी कुणबी समाज मंडळाची स्थापना केली. समाजाच्या मालकीची एक वास्तू जिल्ह्याच्या ठिकाणी निर्माण करण्याचा ध्यास कुरेकार साहेबांनी घेतला व लोकवर्गणीतून भव्य वास्तू उभी केली. तिथे मंगलकार्यालय, विद्यार्थी वसतीगृह व अभ्यासिका सुरू आहे. समाजभान असणारे निवडक सहकारी आणि प्रामुख्याने स्मृतीशेष तात्याजी सेडामे गुरूजींसोबत कुरेकार साहेब पायाला भिंगरी लाऊन फिरले. शहरातील सगळ्या गल्ल्या-मोहल्ले त्यांनी पायाखाली घातले. कोरपना-गडचांदूर-राजूरा-गोंडपिपरी-बल्लारशा-चंद्रपूर-भद्रावती-वरोरा-वणी-मारेगाव-नागपूर-सावनेर-काटोल एवढेच नव्हे तर मध्यप्रदेशातील सौंसर पर्यंत डाॕक्टरसाहेब फिरले व समाजबांधवांना एकविचारात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला.
साधारणतः वीस वर्षांपासून डाॕक्टरसाहेब मराठा सेवा संघाशी जुळले. सेवा संघाच्या विविध कार्यक्रमात सहभागी झाले. सर्वजातीय शेतकरी समाजाला सांस्कृतिक ओळख देण्याचे महत्वाचे कार्य मराठा सेवा संघाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते अशी त्यांची खात्री पटली. मराठा सेवा संघाच्या व्यसनमुक्ती कक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी आपले अमूल्य योगदान दिले. त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळते. निष्ठा, सातत्य आणि त्याग यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व आकाराला आलं. वाचन, मनन, चिंतन, अवलोकन, निरीक्षण यांतून त्यांची जीवनदृष्टी विकसित झाली. सम्यक आहारविहार, व्यायाम, शिस्त यांतून ते घडले.
अशा अनुकरणीय व्यक्तिमत्त्वाचा आदर्श नवपीढीसमोर ठेवण्यासाठी, समाजात विवेक, विज्ञान आणि मानवता रूजावी म्हणून डाॕ. ईश्वर कुरेकार साहेब यांना चंद्रपूर जिल्हा मराठा सेवा संघाचा प्रथम चंद्रपूर गौरव पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभपर्वावर प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे मान्यवरांच्या शुभहस्ते दि. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...