स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
Reg No. MH-36-0010493
मंगेश तिखट (प्रतिनिधी कोरपना): चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, सावलो, पोंभुणां, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती व चिमुर या तुर उत्पादक तालुक्यातील खरिपातील तुरीचे पिक उभे वाळत असल्यामुळे या तुर उत्पादक तालुक्यातील शेतक-यांच्या तुरीच्या पिकाचे पंचनामे करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल सर्व तहसिलदारांना आदेश देवून मागविणे गरजेचे आहे. त्यामुळे तहसीलदारांना आदेश निर्गमित करून पिकांचे पंचनामे करायला लावा अशी मागणी माजी आमदार तथा शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली होती. या मागणीची जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक दखल घेतली असून सर्व तहसीलदारांना पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
तुरीचे हाती आलेले पिक उभे वाळल्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आहे. शासनाच्या एस.डी.आर.एफ./ एन.डी. आर. एफ. च्या निकषाप्रमाणे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देय आहे. त्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने विषयांकीत सर्व तालुक्यातील तहसिलदारांना तुरीच्या शेतातील उभ्या वाळलेल्या / उभवलेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून अहवाल मागविणे आवश्यक आहे असे मत ॲड. चटप यांनी मांडले.
जिल्ह्यातील तुर उत्पादक राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, सावली, पोंभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती व चिमुर या तालुक्यातील तहसिलदारांकडून यथाशिघ्र अहवाल मागविण्यात यावा व तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतचा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातून सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहे.
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...