आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): नागरिकांमधे संवाद वाढावा आणि भारतीय संविधानाला अपेक्षित बंधुभाव वाढून धर्मनिरपेक्षते ची मूल्ये त्यांच्यात वाढावी यासाठी महापुरुषांच्या विचारावर कार्य करणाऱ्या सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने रविवार दि 6 फेब्रुवारी 2022 ला सायंकाळी 6 ते 7.30 दरम्यान wcl कॉलनी शक्ती नगर, दुर्गापूर येथील बुद्ध विहारा जवळील नेताजी सभागृहा जवळील मैदानात संविधान शाखा संपन्न झाली. संविधान शाखेची सुरवात सामूहिक राष्ट्रागीताने करण्यात आली. यात सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे यांच्या मार्गदर्शनात विविध विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत अशोक मस्के, संजय दुर्योधन, भास्कर मुन, भास्कर सपाट, रवींद्र चिलबुले, सूर्यभान झाडें, हरीश सहारे, डॉ बाळकृष्ण भगत, सी आर तेंभरे, डी एस देवाळकर उद्धव गेडाम, ज्योती साव, कुंदन पुणेकर, संजय खोब्रागडे, वनश्री मेश्राम, ई नी भाग घेतला.
चर्चे मधून सर्वानुमते पुढील ठराव घेण्यात आले.
1. विविध स्पर्धा परीक्षा मधे उमेदवाराच्या मुलाखतीसाठी एकूण गुणांच्या केवल 3% गुण ठेवण्यात यावे, यामुळे लेखी परीक्षेत गुणांनुक्रमे उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांवर निवड समिती अन्याय करू शकणार नाही व योग्य उमेदवाराची निवड होईल.
2. सक्त वसुली संचालनालय हे सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे बटीक बनलेले आहे. म्हणून निरपेक्ष बुद्धीने काम व्हावे यासाठी सक्त वसुली संचालनाया ऐवजी सक्त वसुली आयोग नेमण्यात यावा.
3. कोणत्याही प्रकल्पसाठी जमीन अधिग्रहित करतांना त्या प्रकल्पाचे 10% शेअर जमीन मालक शेतकऱ्यांना देण्यात यावे व शेतकऱ्याला ही सह मालक करण्यात यावे.
4. संविधानातील विविध कलमांची माहिती विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणामधून देणे सुरु करावे व संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि सहभागीतेची मूल्ये बालपणा पासूनच मुलावर रुजविण्यात यावी.
5. भारतात भारत याच नावाने संबोधले पाहिजे. संविधानात Bharat that is India असे म्हटले आहे. भारताचा उल्लेख हिंदुस्थान करणाऱ्यावर फोजदारी गुन्हा दखल करण्यात यावा.
संविधान शाखेचा समारोप भारतीय संविधानाच्या उद्धेश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित राष्ट्रावंदनेचे सामूहिक गायन करून करण्यात आले.
शक्ती नगर येथील 9 व्या संविधान शाखेला विविध सामाजिक संघटनाच्या 90 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची आवर्जून उपस्थिती होती.
बळीराज धोटे
मुख्य संघटक
सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट
7410545511, 8855872562
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...